नागपूरमध्ये आढळला स्फोटकांनी भरलेला ट्रक  मंगेश मोहिते
महाराष्ट्र

नागपूरमध्ये आढळला स्फोटकांनी भरलेला ट्रक

नागपूरच्या डबल डेकर पुलावर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक बेवारसरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मंगेश मोहिते

नागपूर - नागपूर शहरात स्फोटकांनी भरलेला एक ट्रक बेवारसरित्या आढळून आल्याने पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः भांभेरी उडाली होती. हा ट्रक नव्याने तयार झालेल्या मेट्रोच्या डबलडेकर पुलावर उभा असल्याने घातपात घडवण्याचा कुणाचा हेतू तर नाही अशी शंका सर्वांच्या डोक्यात आल्याने धाकधूक वाढू लागली होती. A truck loaded with explosives was found in Nagpur

हे देखील पहा -

मात्र ट्रक नादुरुस्त झाल्याने ट्रक चालक मेकॅनिकला शोधण्यासाठी गेला असल्याचं कळलं आणि पोलिसांच्या जीवात जीव आला. सुमारे चार तास चाललेल्या या थरार नाट्याने पोलिसांची मात्र चांगलीच धावपळ झाली. राणा प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नवीन डबल-डेकर मेट्रो पुलावर स्फोटकांचा एक ट्रक संशयास्पद स्थितीत उभा आहे अशी माहिती कंट्रोल रूमला कळताच सर्वांची एकच धावपळ सुरू झाली.

एक्सप्लोसिव्ह असं लिहिलेला ट्रक असल्याने पोलीस यंत्रणेला अलर्ट देण्यात आला. तो पर्यंत प्रताप नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी ट्रक मध्ये कुणीही नव्हतं. त्यामुळे पोलिसांनी ट्रकच्या कॅबिनची झडती घेतली असता ट्रक चालकांचा मोबाइल नंबर त्या ठिकाणी लिहून दिसला तेव्हा पोलिसांनी त्याला संपर्क केला असता ट्रक नादुरुस्त झाल्यामुळे मेकॅनिकच्या शोधात ट्रक सोडून बाहेर पडलो असल्याची माहिती चालकाने दिली. मात्र लगेच त्याचा फोन बंद झाल्याने पुन्हा शंका कुशंका वाढायला लागल्या होत्या. अखेर तो चालक आपल्या ट्रक जवळ आला तेव्हा पोलिसांचा जीव भांड्यात पडला. पोलिसांनी तो ट्रक मेकॅनिकच्या मदतीने दुरुस्त करून घेतला आणि सोनेगाव पोलिस ठाण्यात जमा केला.

स्फोटकांनी भरलेला हा ट्रक हैदराबाद येथून निघाला होता, त्यामध्ये खाणीत स्फोट घडवून आणण्यासाठी उपयोगात येणारे स्फोटके होती. मध्यप्रदेशच्या सिंगरोली आणि पश्चिम बंगाल येथील स्फोटके त्यामध्ये होती. पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT