Surabhi Jayashree Jagdish
रत्नागिरी हा जिल्हा कोकणातील असून, तो आपल्या सुंदर समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले आणि आंबा बागांसाठी ओळखला जातो.
रत्नागिरीजवळ एक कमी प्रसिद्ध असलेलं पण सुंदर ठिकाण आहे, ज्याला 'माचाळ' म्हणतात.
माचाळ हे रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात आहे. हे ठिकाण रत्नागिरी शहरापासून सुमारे ५०-६० किलोमीटर अंतरावर आहे.
माचाळ हे ठिकाण त्याच्या उंचीमुळे आणि वर्षभर थंड असलेल्या आल्हाददायक हवामानामुळे 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाते. पावसाळ्यात इथलं सौंदर्य पूर्णपणे बहरलेलं असतं.
माचाळच्या आजूबाजूला घनदाट जंगल आहे. निसर्गप्रेमी आणि शांतता शोधणाऱ्यांसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत इथं अनेक छोटे-मोठे धबधबे तयार होतात, जे पर्यटकांना आकर्षित करतात.
डोंगरमाथ्यावर असल्याने इथून आजूबाजूच्या दऱ्या आणि गावांचं दृश्य दिसतं. त्यामुळे ट्रेकिंगसाठी हे एक आदर्श ठिकाण आहे.
समुद्रकिनाऱ्यासोबतच डोंगराळ भागाचा अनुभव घ्यायचा असेल, तर माचाळ हे एक उत्तम पर्याय आहे.