उल्हासनगरात गुंडांचा हैदोस! व्यापाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण Saam Tv
महाराष्ट्र

उल्हासनगरात गुंडांचा हैदोस! व्यापाऱ्याला लोखंडी रॉडने मारहाण

मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक दोन या परिसरात ही घटना घडली ङआऐ

अजय दुधाने

उल्हासनगर: एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला काही गुंडानी लोखंडी रॉडने जबर मारहाण केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली आहे. कॅम्प नंबर दोन भागातील एका दुकानात तीन दिवसापूर्वी काही गुंडाचे व्यापाऱ्यां बरोबर हाणामारी झाली होती. हा वाद मिटवण्यासाठी दुकानाचा कर्मचारी दीपक छाब्रिया हा गेला होता.

तसेच या गुंडान विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास व्यापाऱ्यां सोबत तो होता. याचाच राग मनात ठेवून या गुंडांनी आज रात्री साडेनऊ वाजताच्या दीपक छाब्रिया हा राहुल शूज दुकाना बाहेर उभा असताना त्याच्यावर हल्ला केला त्याला लोखंडी रॉडने आणि लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली तसेच हे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या राहुल शूज दुकानाचे मालक दीपक गोकलानी यांनाही या गुंडांनी मारहाण करत दुकाना बाहेर तोडफोड केली.

ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे. या हाणामारीत जखमी झालेल्या दीपक गोपलानी आणि दुकानाचा कर्मचारी दीपक छाब्रिया यांना उल्हासनगर मधील ममता नर्सिंग होम या रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या हल्ल्यात दीपक छाब्रिया हे गंभीर जखमी झाले असून, हल्ला करुन ते 4 ही हल्लेखोर पळून गेले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर उल्हासनगरमधील व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. व्यापारी संघटना सतत गुंडांकडून व्यापाऱ्यांना होणाऱ्या मारहाणीचा संताप व्यक्त करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT