Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

शाळेकडे जाण्यासाठी रस्त्याची मागणी करणाऱ्या शिक्षकास शेतकऱ्यांकडून मारहाण

रस्त्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले म्हणून वस्ती शाळेच्या शिक्षकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे.

विनोद जिरे

बीड : रस्त्याच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले म्हणून वस्ती शाळेच्या शिक्षकाला (Teacher) मारहाण केल्याची घटना घटना बीडच्या (Beed) केज तालुक्यातील जीवाचीवाडी या गावात घडली आहे. गोकुळ सखाराम सारुक असे मारहाण झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. ते जिवाचीवाडी येथील हनुमान वस्ती शाळेवर कार्यरत आहेत.

मारहाण करण्यात आलेल्या शिक्षकांच्या वडीलांनी सदरच्या वस्ती शाळेसाठी (School) जागा दिलेली आहे. परंतु सध्या शाळेकडे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे गोकुळ सारुक यांनी जिल्हाधिकारी व तहसीलदारांना निवेदनाद्वारे शाळेसाठी रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र, या रस्त्याला काही शेतकऱ्यांचा विरोध आहे.

शेतकऱ्यांचा विरोध असताना देखील सारुक यांनी पाठपुरावा सुरुच ठेवला होता. त्यामुळे तहसीलदारांनी सुनावणीसाठी या शाळेकडे जाण्यासाठी रस्त्यात ज्या शेतकऱ्यांची जमीन येते त्या सर्वांनाच बोलावलं होतं. शिवाय तहसीलदार यांनी देखील स्वतः घटनास्थळी जाऊन रस्त्यासाठी शेतांची पहाणी केली.

दरम्यान, तहसीलदार (Tehsildar) यांनी केलेल्या पहाणी नंतर आपल्याच शेतातून रस्ता जात असल्याच्या रागातून ६ जणांनी शाळेत घुसुन शिक्षक सारुक यांना रस्त्याची मागणी का करतो ? असा प्रश्न विचारत शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, जिवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार गोकुळ सारुक पोलिस ठाण्यात दिली आहे.

पाहा व्हिडीओ -

याप्रकरणी बीडच्या केज पोलीस ठाण्यात गोकुळ संभाजी चौरे, केशव संभाजी चौरे, श्रीहरी जोतीराम चौरे, मच्छिंद्र महादेव चौरे, कृष्णा मधुकर चौरे, आसाराम जोतीराम चौरे सर्व रा. जिवाचीवाडी ता. केज यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT