Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : पोलीस दलाला लाचखोरीचं ग्रहण? पोलीस निरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले

चोर,दरोडेखोर यांच्यावर कारवाई करणे तर दूरच पण पोलिसच लुटारू सारखे वागू लागले आहेत.

विनोद जिरे

बीड - गेल्या चार दिवसांपूर्वीचं बीडच्या शिवाजीनगर पोलीस (Police) ठाण्यातील दोघांना, लाच (Bribe) घेताना रंगेहाथ अटक केल्याची घटना ताजी असतानाच, आता सिरसाळा पोलीस ठाण्यातील एका पोलीस उप- निरीक्षकला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलय. (Latest Beed News)

दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी 25 हजाराची मागणी करून त्रास देणाऱ्या प्रकाश शेळके या पोलीस उपनिरीक्षका विरोधात बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रारीनंतर खात्री करून एसीबीने सापळा रचला. यादरम्यान तडजोडीअंती 10 हजार रुपये स्वीकारताना पोलिसांनी शेळके यास रंगेहाथ पकडले आहे.

दरम्यान यामुळं बीड जिल्हा पोलीस दलाला लाचखोरीचं ग्रहण लागल्याचं समोर आलं असून पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांचा वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. चोर,दरोडेखोर यांच्यावर कारवाई करणे तर दूरच पण पोलिसच लुटारू सारखे वागू लागले आहेत.

अवैध धंदे करणाऱ्याकडून खा,प्या,मजा करा आणि हप्ते घेऊन गप्प बसा अशी भूमिका सध्या पोलिसांची आहे. त्यामुळे तीन दिवसात तीन लाचखोर पकडले गेले आहेत. यामुळं अशा लाचखोरांवर कडक कारवाई करा अन जिल्ह्यातील जनतेला चोर, दरोडे, अवैध धंद्यापासून मुक्ती द्या. अशी मागणी जिल्हावासीयांमधून होत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT