Electricity Theft Saam tv
महाराष्ट्र

वीजचोरी पडली महागात! एक वर्षाचा तुरुंगवास, गडहिंग्लज न्यायालयाचा निकाल

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: राज्यात अनेक ठिकाणी वीजचोरीच्या घटना समोर येत आहेत. आता वीजचोरी (Electricity) महागात पडू शकते. कोल्हापूर जिल्ह्यातील असेच एक प्रकरण समोर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीजचोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४० वर्ष) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकांने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मुल्याप्रमाणे २ लक्ष ५० हजार रूपयांची वीजचोरी केली होती.

१९ नोव्हेंबर २०१५ रोजी ढोलगरवाडी (ता.चंदगड) येथील वीजग्राहक (Electricity) भाऊराव संभाजी पाटील यांचे सातेरी राईस मिलच्या वीजमीटरची पंचासमक्ष घटनास्थळी तपासणी करण्यात आली होती. प्रथमदर्शनी वीज मीटरचे पीव्हीसी सील तुटलेले व स्टिकर सील संशयास्पद स्थितीत आढळून आले. ॲक्युचेक यंत्राच्या सहाय्याने वीज मीटर तपासणी केली. या तपासणीत वीजमीटर संथ गतीने फिरत असल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला. पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले.

या वीज (Electricity) मीटरची गडहिंग्लज येथे २० नोव्हेंबर २०१५ रोजी वीज भार तपासणी करून पंचनामा करण्यात आला. या वीजभार तपासणीत वीजमीटर ७५.९४ टक्के संथ गतीने फिरत असल्याचे आढळून आले. पुन्हा पंच व ग्राहकासमक्ष सक्षम अधिकारी यांनी वीज मीटर सील केले. दि.२१ नोव्हेंबर २०१५ रोजी कोल्हापूर येथील वीज तपासणी प्रयोगशाळेत ग्राहकासमक्ष वीज मीटर तपासले. या तपासणीत वीज मीटरमध्ये वीज वापर कमी नोंदवला जावा, अशा पध्दतीने फेरफार केल्याचे सिद्ध झाले.

ग्राहकाने सदरील वीजचोरीच्या २२ फेब्रुवारी २०१४ ते १९ नोव्हेंबर २०१५ या निर्धारित १९ महिने कालावधीत २४ हजार ६७५ युनिटची वीज चोरी केली आहे. ग्राहकास वीजचोरीच्या युनिटचे आर्थिक मुल्यानुसार रू. २ लक्ष ५० हजार व तडजोडीचे रक्कम रू १ लक्ष ५० हजार इतके बिल देण्यात आले होते. मात्र नोटीस देऊनही ग्राहकाने वीजबिल भरले नसल्याने महावितरणच्या फिर्यादीनुसार विद्युत कायदा २००३ कलम १३५ व १३८ अन्वये भाऊराव संभाजी पाटील यांचेविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत गडहिंग्लज न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची साधी कैद व १० हजार रुपये दंडाची, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद ही शिक्षा ठोठावली आहे.

सदरील प्रकरणी पुणे परिक्षेत्राचे उपसंचालक निवृत्त कमांडर शिवाजी इंदलकर यांचे मार्गदर्शन लाभले. भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता अमित बोकील व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली होती. या प्रकरणी सरकार पक्षातर्फे ॲड. सुनिल तेली यांनी कामकाज पाहिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

SCROLL FOR NEXT