बिर्याणीत मिसळले गुंगीचे औषध.. बेशुद्ध तरुणीवरती नराधमाकडून बलात्कार ! Saam Tv
महाराष्ट्र

बिर्याणीत मिसळले गुंगीचे औषध.. बेशुद्ध तरुणीवरती नराधमाकडून बलात्कार !

मित्राने तरुणीला बिर्याणी खायला आणली, त्या बिर्याणीमध्ये त्यांने गुंगीचे औषध मिसळून तिला खायला दिली आणि...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सांगली - सांगली Sangali जिल्ह्यामधील वाळवा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. मित्राने तरुणीला बिर्याणी खायला आणली होती त्या बिर्याणीमध्ये त्यांने गुंगीचे औषध मिसळून तिला खायला दिली आणि बेशुद्ध अवस्थेत असणाऱ्या तरुणीवर बलात्कार Rape केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हे देखील पहा -

तरुणीला बेशुद्ध Unconscious करुन बलात्कार केल्याप्रकरणी अतुल बाजीराव पाटील (रा. येडेमच्छिंद्र) या नराधमास इस्लामपूर पोलिसांनी अटक Islampur police arrest केली आहे. तसेच त्याला न्यायालयाने दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या नराधमाने तरुणीवरती बलात्कार करुन त्याचे चित्रिकरण देखील केले होते तसेच ते केलेले चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देत या तरूणीवर गेल्या 2 वर्षापासून तो बलात्कार करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अतुलचे पिडीत तरुणीच्या घरी सारखे येणे-जाणे होते. 2 वर्षांपूर्वी तो तरूणीच्या घरी गेला होता. तरूणी घरात एकटी असताना तरुणीला बिर्याणी खायला दिली. ज्यामध्ये त्याने गुंगीचे औषध मिसळले होते. दरम्यान तरुणी बेशुद्ध झाल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच बलात्काराचे चित्रिकरण व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने तरुणीच्या घरी, लॉज Lodge वरती तिच्यावर वारंवार बलात्कार केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT