Wardha Crime News  saam tv
महाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तिच्याच जन्मदिनी केला व्हायरल; गुन्हा दाखल

एका अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्याच वाढदिवसा दिवशी व्हायरल केला असल्याची घटना समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

वर्धा: वर्धा (Wardha) येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अल्पवयीन मुलीचा अश्लिल व्हिडिओ तयार करुन तिच्याच वाढदिवसा दिवशी व्हायरल केला असल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एक तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आर्वी शहरातील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून एका मुलीचा अश्लिल व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित करुन तिच्या वाढदिवशीच सोशल मीडियावर व्हायरल करुन मुलीची बदनामी करुन विनयभंग केला. प्रकरणाची तक्रार अमरावती येथील गाडगेनगर पोलिसात दाखल झाली आहे. मात्र, घटनास्थळ आर्वी शहरातील असल्याने हे प्रकरण आर्वी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस (Police) निरीक्षक भानुदास पिदूरकर यांनी दिली.

अमरावती (Amaravati) येथील अल्पवयीन मुलगी आर्वीत शिक्षणासाठी असताना सप्टेंबर २०२० मध्ये तिची ओळख गौरव घोडेस्वार नावाच्या तरुणासोबत झाली. त्याने तिच्याशी जवळीक साधून तिला आर्वी येथील संस्कृती गार्डनमध्ये बोलावून स्वत:च्या मोबाईलमध्ये अश्लिल व्हिडिओ चित्रित केले. यावेळी मुलीने त्याला नकार दिला.

१ सप्टेंबर २०२२ रोजी मुलीचा वाढदिवस असल्याने ती तिच्या कुटुंबियासोबत अमरावती येथील घरी असताना तिच्या चुलत भावाने मुलीच्या वडिलांच्या मोबाईलवर वर्षभरापूर्वी गौरवने काढलेला दिसला. तो व्हिडिओ आरोपी गौरव याने स्वत:च्या स्टेटसवर ठेवला होता. यामुळे मुलीची बदनामी झाली. अखेर मुलीने थेट अमरावती येथील गाडगेनगर पोलीस (Police) ठाणे गाठून याबाबतची तक्रार दाखल केली.

अमरावती जिल्ह्याच्या गाडगेनगर पोलिसांनी आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल करुन सदर प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत आर्वी पोलिसांकडे वर्ग केले. आर्वी पोलिसांनी याप्रकरणात आरोपी गौरवविरुद्ध गुन्हा दाखल केला असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, अशी माहिती आर्वी पोलिसांनी (Police) दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT