Jalna Crime लक्ष्मण सोळुंखे
महाराष्ट्र

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांची टोळी जेरबंद

दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात भोकरदन पोलिसांना यश आला

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: भोकरदन शहरात सह परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात भोकरदन पोलिसांना (police) यश आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भोकरदन (Bhokardan) तालुक्यात या दरोडेखोरांच्या टोळीने उच्छाद मांडत बंद असलेल्या घरांचे कुलुप कोंडा तोडुन घर फोडी करुन किंमती ऐवज चोरुन नेल्याच्या मोठ्या घटना घडले होते. त्या अनुषणगाने पोलिसांनी (police) रात्रीची गस्त वाढविण्यात आली होती.

हे देखील पाहा-

रात्रीच्या वेळी पोलिस गस्त घालत असताना भोकरदन- राजुर महामार्गावर पेट्रोलपंपच्या समोर एक चारचाकी वाहन आणि दुचाकी घेऊन ३ जण उभे असल्याचे आढळून आले होते. नंतर पोलिसांनी (police) त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवा- उडवीची उत्तरे दिली. तिघांनी ही रात्रीच्या वेळी तोंडाला मास्क लावलेले असल्याने पोलिसांना त्यांचा संशय आला होता. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता, त्यांच्याकडून लोखंडी कटर, लोखंडी टॉमी, रॉड, हॅण्ड ग्लोज असे दरोडा घालण्याचे साहित्य आढळून आले आहे.

सदरील ५ ही जण दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याने, भोकरदन पोलिसांनी या पाच दरोडेखोरा विरुद्ध पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या ताब्यातून छोटा हत्ती, एक दुचाकी व दरोडा टाकण्याचे साहित्य ही जप्त केले असून यांनी या पूर्वी जिल्ह्यात कुठे कुठे दराडे टाकले या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यातील तीनशे घरात शिरलं पाणी

Ravivar Upay: रविवारच्या दिवशी सूर्यदेवाची पुजा केल्यानंतर करा 'हे' उपाय; अडकलेली सर्व कामं होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT