Republic Day : 'फक्त स्वंयसेवकांनी नव्हे, सर्वसामन्य नागरिकांनीही क्रांतीविरांना मदत केली'
Republic Day : 'फक्त स्वंयसेवकांनी नव्हे, सर्वसामन्य नागरिकांनीही क्रांतीविरांना मदत केली' मंगेश मोहिते
महाराष्ट्र

Republic Day : 'फक्त स्वंयसेवकांनी नव्हे, सर्वसामन्य नागरिकांनीही क्रांतीविरांना मदत केली'

मंगेश मोहिते

नागपूर : नागपूरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS)मुख्यालयात आज सकाळी ८ वाजता झेंडावंदन पार पडलं. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा स्वीकारलेल्या गणतंत्रानुसार आतापर्यंत आपण चाललो की नाही, पुढे किती चालायला हवं. याचं स्मरण करण्याचा आजचा दिवस असून स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलं, कोण कोण क्रांतीवीर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते, त्याची आठवण करण्याचा आजचा दिवस जसं आपण आपल्या जन्मदिनी संकल्प करतो, तसा संकल्प आज करावा, देशाला प्रगतीच्या वाटेवर नेण्याचा संकल्प करावा असं वक्तव्य नागपूर महानगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक राजेश लोहिया (Rajesh Lohia) यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

दरम्यान हेडगेवार आणि सुभाषचंद्र बोस (Hedgewar and SubhashChandra Bose) यांच्या भेटीवरती उर्जामंत्री नितीन राऊतांनी (Nitin Raut) केलेल्या वक्तव्यावरती ते म्हणाले, संघाचे स्वयंसेवक, अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. स्वातंत्र्य लढण्यात अनेक क्रांतीविरांशी संपर्क आले, संघ स्वयंसेवकांनी त्यांना मदत केली. फक्त संघ स्वंयसेवकंच नाही, तर सर्वसामन्य नागरीकांनीही क्रांतीविरांना मदत केली. भेटीबाबत जे वास्तव आहे ते आहे. ज्या बातम्या चालतात त्यावर आज चर्चा नाही.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghati Hospital : घाटी रुग्णालयातील नर्सेसचे काम बंद; मनुष्यबळ वाढविण्याची मागणी 

Hingoli Krushi Utpanna Bazar Samiti : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! हिंगाेलीत आठवड्यातून पाच दिवस हळद खरेदी सुरू करणार

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Today's Marathi News Live : नाराज आबा बागुल काँग्रेस रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारात

Salman Khan News : भाईजान अर्ध्या रात्री लंडनहून मुंबईत परतला; विमानतळावर पापाराझींची नजर चुकवत गाठलं घर

SCROLL FOR NEXT