A fine of Rs 500 and one month in jail will be imposed if photo-video reels are taken on the Samruddhi Highway Saam TV
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: सावधान! समृद्धी महामार्गावर फोटो-रील्स काढाल, तर जेलमध्ये जाल; पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

Samruddhi Mahamarg News: तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून रील्स आणि फोटो काढणं आता महागात पडणार आहे.

डॉ. माधव सावरगावे

Samruddhi Mahamarg Latest News: तुम्ही जर समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण, समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून रील्स आणि फोटो काढणं आता महागात पडणार आहे. वाहतूक पोलिसांनी समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. (Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर वाहने थांबवून अनेक तरुण तसेच तरुणी फोटो तसेच रील्स काढण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबादजवळ समृद्धी महामार्गावरील पुलावर हुल्लडबाज तरुण रील्स काढत असल्याचं आढळून आलं आहे.

समृद्धी महामार्गावरून जाणारी वाहने ही सुसाट वेगात असतात. अशातच रस्त्यावरून कुणी आडवं गेल्याने वाहनचालकांना अडचणीचा सामना करावा लागतो. काहीवेळा अचानक ब्रेक दाबल्याने अपघात (Accident) होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हीच बाब समोर येताच वाहतूक पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.

समृद्धी महामार्गावर रील्स तसेच फोटो काढण्यासाठी आता मनाई करण्यात आली आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांना 500 रुपये दंड आणि एक महिन्याच्या तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली जाणाी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा समृद्धी महामार्गावर फोटो आणि रील्स काढण्यासाठी थांबत असाल, तर सावध राहणे गरजेचे आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT