मयत शंकर गणपत लोणबले संजय राठोड
महाराष्ट्र

वरझडी येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन महिला जखमी

सध्या शेतीची मशागत सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय राठोड

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरझडी येथील 37 वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला असून दोन महिला जखमी झाल्याची घटना दि 7 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली आहे. शंकर गणपत लोणबले (40) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून तो वरझडी( बंडा) येथील रहिवाशी असून त्याचे याच गावात शेत आहे.

सध्या शेतीची मशागत सुरू असल्याने शेतकरी दिवसभर शेतात राबताना दिसत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. दि 7 जुलै ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाटा सह वरझडी परिसरात पावसाला सुरुवात झाली शंकर आपल्या शेतात काम करीत होता. पावसाला सुरुवात झाल्याने शेतात काम करणाऱ्या दोन महिला शेतात असलेल्या झोपडीत आसरा घेतला तर शंकर झोपडी लगतच असलेल्या झाडा खाली उभा असतांना त्याच्या अंगावर वीज कोसळली तर झोपडीत महिलांना याचा जोरदार झटका लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.

वीज पडल्याची माहिती लगत शेतात काम करीत असलेल्या काही मजुरांना कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली त्या तिघांना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टराणी शंकरला मृत घोषित केले तर जखमी दोन्ही महिलांना पुढील उपचारा करिता चंद्रपूर येथे हलवलीण्यात आले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT