Buldhana News
Buldhana News Sanjay Jadhao
महाराष्ट्र

Buldhana News: शेतकरी पती पत्नीने एकत्र विष घेऊन संपवले जिवन; वृद्ध दाम्पत्यावर का आली ही वेळ?

साम टिव्ही ब्युरो

संजय जाधव

Buldhana News: बुलढाण्यात एक वृद्ध शेतकरी दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, निसर्ग साथ देत नाही. शेतीला लावलेला खर्च निघत नाही. कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, बँकेचा कर्जाचा तगादा त्यातच खाजगी कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच नांदुरा तालुक्यातील बेलूरा येथील एका वृध्द पती- पत्नीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. सौ. सरलाबाई वसंत डामरे आणि वसंत जगदेव डामरे असे आत्महत्या केलेल्या वृद्ध पती पत्नीचे नाव आहे. (Latest Buldhana News)

नांदुरा तालुक्यातील बेलूरा येथील 70 वर्षीय वसंत डामरे आणि 65 वर्षीय सौ.सरलाबाई वसंत डामरे हे आपल्या मुलासोबत राहत होते. यांच्याकडे 2 एकर शेती असून त्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून होता. अत्यल्प शेती असल्याने त्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. तसेच सरलाबाई यांची तब्येत कमजोर असल्याने त्या सतत आजारी असायच्या. त्यांच्या ओषधपाण्यासाठी बरेच पैसे खर्च होत होते.

यावेळी शेतीतून पत्नीच्या आजाराला लागलेला खर्च तसेच महाराष्ट्र बँकेचे शेतीसाठी घेतलेले कर्ज, शेतीला लावलेला खर्च निघाला नाही. कुटुंबातील 5 ते 6 जणांचा उदरनिर्वाह कसा करावा, कर्ज कसे फेडावे या विवंचनेतच सरलाबाई डामरे आणि वसंत डामरे यांनी विषारी औषध प्राशन केले आणि आपली जीवनयात्रा संपविली. डामरे कुटुंबं उघड्यावर पडले असून बोराखेडी पोलिसांनी शव विच्चेदनासाठी सामान्य रुग्णाल्यात शव पाठविले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

Arunachal Pradesh: फिरायला जाण्याचा प्लॅन करताय, मग एकदा अरुणाचल प्रदेशला भेट द्या

CSK Vs SRH : चेन्नईच्या बॉलर्सची 'सुपर' बॉलिंग; हैदराबादचा १३४ धावांवर उडवला धुव्वा

Dr. Anjali Nimbalkar : डॉ. अंजली निंबाळकर यांनी प्रचारातही निभावली ड्यूटी ; अपघातातील जखमीला उपचार करत स्वतः घातले टाके

Shivani Narayanan: बॉलीवूडच्या नटीही भरतील पाणी, फक्त सुंदर नाही भारी दिसते साऊथची 'शिवानी'

SCROLL FOR NEXT