Viral Video Saam TV
महाराष्ट्र

Viral Video: नशेमध्ये प्रियकराला चालताही येईना, प्रेयसीने केलं असं काही की, तुम्हीही म्हणाल अशीच जोडीदार हवी

दारू पिलेल्या प्रियकराला प्रेयसीने घेतलं कडेवर

Ruchika Jadhav

Viral Video: आपला जोडीदार कसा असावा यासाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. बऱ्याच मुली मुलं पसंत करताना त्याच्याकडे चांगली नोकरी, घर आणि विशेष म्हणजे तो निर्व्यसनी असावा अशी अपेक्षा ठेवतात. अशात जर प्रियकर किंवा पतीने दारू पिल्यावर अनेक मुली कडाक्याचे भांडण करतात. मात्र सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतं आहे जो पाहून प्रत्येक मुलाला अशी जोडीदार मिळावी असेच वाटेल. (Latest Viral News)

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी आणि तिचा प्रियकर आहेत. यात मुलाने जरा जास्तीचं ड्रिंक केलं आहे. ड्रिंक जास्त झाल्याने त्याला नीट उभही राहता येत नाही आणि चालताही येत नाही. आता दुसरी एखादी मुलगी असती तर तिने प्रियकराला तिथेच सोडून घरी निघून गेली असती. मात्र या प्रेयसीने प्रियकराला चक्क उचलून घेतलं आहे.

प्रियकराला उचलून आपल्या खांद्यावर टाकत ती त्याला घरी घेऊन जात आहे. तिथे असलेल्या एका व्यक्तीने त्यांचा हा व्हिडिओ आपल्या फोनमध्ये कैद केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतं आहे. फक्त ११ सेकंदाच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांच चांगलच मनोरंजन केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होतं असलेला हा व्हिडिओ नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा म्हणजे ३१ डिसेंबरच्या रात्रीचा आहे. एका हिंदी वृत्त वाहिनीने याची माहिती दिली. यावर आता अनेकजण वेगवेगळ्या आणि मजेशीर कमेंट करत आहेत. एकाने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, अशी जोडीदार मिळवण्यासाठी मोठं नशीब लागतं. तर आणखीन एकाने लिहिलं आहे की, पुढच्या जन्मात तरी अशी जोडीदार दे देवा. प्रेयसीने केलेला हा पराक्रम पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

10 Gram Gold Mangalsutra : 10 ग्रॅम सोन्यामध्ये बनवा सुंदर मंगळसूत्र; ‘या’ 5 स्टायलिश डिझाईन्स पाहुन नवराही होईल खूश

Apple CEO Resign : Apple चे CEO टिम कुक यांचा राजीनामा! सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती; नवे सीईओ कोण? जाणून घ्या

Jeeryach Paani: जिऱ्याचं पाणी की अॅपल सायडर व्हिनेगर? वजन कमी करण्यासाठी सकाळी काय प्यावं?

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

तुम्ही खात असलेले मसाले, चहा पावडर सुरक्षित आहे का? एक्स्पायरी डेट बदलण्याचा काळाबाजार उघड

SCROLL FOR NEXT