सांगली DCC बँकेसाठी 85.31 टक्के मतदान; 23 नोव्हेंबरला मतमोजणी सांगली DCC बँकेसाठी 85.31 टक्के मतदान; 23 नोव्हेंबरला मतमोजणी
महाराष्ट्र

सांगली DCC बँकेसाठी 85.31 टक्के मतदान; 23 नोव्हेंबरला मतमोजणी

त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबरकडे होणाऱ्या मतमोजनीकडे लागल्या आहेत.

विजय पाटील

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी (Sangli District Central Co-operative Bank) आज चुरशीने मतदान पार पडले. यामध्ये सहकार पॅनल आणि शेतकरी विकास पॅनेलमध्ये सरळसरळ लढत होत आहे. या निवडणुकीसाठी 85.31 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणुकीनंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा 23 नोव्हेंबरकडे होणाऱ्या मतमोजनीकडे लागल्या आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रणित सहकार विकास पॅनल रिंगणात आहे. या पॅनेलचे तीन उमेदवार यापूर्वीच बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे उर्वरित गटासाठी आज मतदान पार पडले. या निवडणुकीत सहकार पॅनेलला टक्कर देण्यासाठी भाजपा प्रणित शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे. आज प्रत्यक्ष निवडणुकीसाठी पार पडलेल्या मतदानात 85.31 इतके मतदान पार पडले. मतदानानंतर दोन्ही पॅनेलच्या नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. पण काही ठिकाणी क्रॉस व्होटिंगची शक्यता नाकारता येत नसल्याने काही जागांवर धक्कादायक निकाल लागू शकतात. त्यामुळे 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजनीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhau Beej 2025: बहिणींनो, भावाला ओवाळताना या चुका मुळीच करू नका, नाहीतर...

Crime: भरचौकात तरुणाला गाठलं, चाकूने सपासप वार करत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

प्रवाशांसाठी खूशखबर! कल्याण ते नवी मुंबई मेट्रो प्रवास फक्त ४५ मिनिटांत; किती स्थानके अन् रूट कसा?

Shocking : मुलगा आणि सूनेच्या जाचाला कंटाळून वडिलांनी आयुष्य संपवलं; रेल्वे ट्रॅकजवळ आढळला मृतदेह

Eknath Chitnis Death: ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; १०० व्या वर्षी अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT