8 patients tested covid-19 positive jn 1 variant in buldhana  Saam Tv
महाराष्ट्र

Covid-19 JN.1 Variant चा बुलढाणा जिल्ह्यात शिरकाव, रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली

नागरिकांनी मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

संजय जाधव

Buldhana News :

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. महाराष्ट्र राज्यात देखील काेराेनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. तीन दिवसांत बुलढाणा जिल्ह्यात नव्याने 7 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. या जिल्ह्यात आता एकूण 8 काेराेनाबाधितांची संख्या (covid cases in buldhana) झाली आहे. हे रुग्ण काेराेनाच्या जेएन.1(Corona JN.1) या नव्या व्हेरियंटचे असल्याची माहिती प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

बुलढाणा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनूसार एक जानेवारीला पहिला कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आला. आता नव्याने 7 जणांना काेराेना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. शिरपूर येथील 50 वर्षीय कोरोना संसर्गीत महिलेस स्त्री रुग्णालयात भर्ती करण्यात आले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 2, चिखली येथे 1 (महिला) तर बुलढाणा शहर व तालुक्यातील एकूण 4 जणांना काेराेनाची लागण झाली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये काेराेनाचे रुग्ण आढळल्याने प्रशासनाने तातडीने रुग्ण तपासणींवर भर दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT