India Book of Records
India Book of Records Saam Tv
महाराष्ट्र

India Book of Records: कौतुकास्पद! सात वर्षांच्या अर्णवीचा इंडिया बुकमध्ये रेकॉर्ड, सलग तीन तास 39 मिनीट भरतनाट्यम नृत्य

साम टिव्ही ब्युरो

>> चेतन व्यास

India Book of Records: वर्धा येथील अर्णवी सागर राचर्लावार या सात वर्षाच्या चिमुकलीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव कोरले आहे. तिने तब्बल तीन तास ३९ मिनीट भरतनाट्यम नृत्य करत विक्रम स्थापित केला आहे. चन्नावार्स ई विद्या मंदिरमध्ये इयत्ता तिसरीत शिकणारी अर्णवीने सलग ३ तास ३९ मिनिटे 'भरतनाट्यम' नृत्य सादर करीत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदविले.

इंडिया बुक ऑफ रेकॉर्डच्या वतीने अर्णवीला एक तासाचे लक्ष देण्यात आले होते. एक तासाचे लक्ष पार करत अर्णवीने सलग ३ तास ३९ मिनिट भरतनाट्यम नृत्य करत नवा विक्रम नोंदविला. इडिया बुक ऑफ रेकॉर्डचे निर्णायक डॉ. मनोज तत्ववादी यांनी अर्णवीला प्रमाणपत्र देऊन इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याचे जाहीर केले.

मिळालेल्या माहितीनुसार, दत्ता मेघे सभागृह सावंगी (मेघे) वर्धा येथे सकाळी १० वाजून ४६ मिनिटाला नृत्याची सुरवात करून सलग ३ तास ३९मिनिटे आपला नृत्याविष्कार सादर करीत संपूर्ण वर्धेकरच पारणे फेडत वर्धेकरांना मंत्रमुग्ध केले.  (Latest Marathi News)

तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस अधीक्षक नुरुल हसन, डॉ.अभ्युदय मेघे, दिनेश चन्नावार, डॉ. सचिन पावडे, डॉ. स्मिता पावडे, वैशाली येरावार, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डचे डॉ. तत्त्ववादी, परिवारातील सदस्य यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व माता सरस्वती व नटराज पूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. मान्यवरांचे स्मृतिचिन्ह व रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.

अर्णवीची आई दीपाली सागर राचर्लावार यांनी आपले आनंदाश्रू आवरत उपस्थित असलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचे, पारिवारिक सदस्य, मित्रगण व वर्धेकरांचे आभार मानत कायमच त्यांच्या ऋणात राहू, असे प्रतिपादन केले.

अर्णवी ही वयाच्या तिसर्‍या वर्षांपासून गुरु सचिन डंबारे यांच्याकडे नृत्याचे प्रशिक्षण घेत अवघ्या ७ वर्षात जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्टीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून १३७ पारितोषिके, पुरस्कार व बक्षिसांची मानकरी ठरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shraddh Akapoor : श्रद्धाचा अस्सल रावडी स्वॅग

Sanjay Raut News | फडणवीसांना शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते? राऊतांचा मोठा दावा!

Bank Holiday: मतदानामुळे उद्या देशातील 49 शहरात बँका राहणार बंद, महाराष्ट्रातील शहरांची पाहा लिस्ट

Akola News : पाण्यासाठी शोले स्टाईल आंदोलन; उपसपंचासह सदस्यांचे अकोटमध्ये आंदोलन

Loksabha Election 2024: 'शतकवीर' जयंत पाटील! पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढला; प्रचारसभांचा केला अनोखा विक्रम |VIDEO

SCROLL FOR NEXT