कोल्हापूर हादरले! जिल्ह्यातील कापशी गावात 7 वर्षीय मुलाचा नरबळी? Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापूर हादरले! जिल्ह्यातील कापशी गावात 7 वर्षीय मुलाचा नरबळी?

गावात दोन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एका मुलाचा मृतदेह घरामागे हळद- कुंकू लावून टाकण्यात आल्याचं आढळून आला

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कापशी या गावात दोन दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एका मुलाचा मृतदेह घरामागे हळद- कुंकू लावून टाकण्यात आल्याचं आढळून आला आहे. त्याचा खून करून मृतदेह घरामागे टाकल्याची चर्चा असून हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हे देखील पहा-

आरव केशव केशरे असे या खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास कापशी या ठिकाणी घरामागे त्याचा मृतदेह दिसला. त्याच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. यामुळे त्याचा खून करून मृतदेह घरामागे टाकल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

दरम्यान, हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त होत आहे.या घटनेमुळं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शाहूवाडी पोलिस करत आहेत. पुरोगामी महाराष्ट्राला काळींबा फासण्याचा हा प्रकार आहे. या चिमुकल्याचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain: 'किती बारीक आहेस!' असे टोमणे ऐकू वैतागलाय? मग वजन वाढवण्यासाठी करा हा सोपा घरगुती उपाय

अनधिकृत बॅनर्सवर ठाण्यात बुलडोझर! 8 दिवसांत 1524 अनधिकृत होर्डिंग्ज हटवले

राहुल गांधींच्या नाकातून निघालं रक्त; पोलिसांनी उचलताना नाकाला दुखापत झाल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: परभणीत मध्यरात्री धक्कादायक घटना; आलिशान कारमधून येत मोकाट गायीची चोरी

Hair Care: पावसाळ्यात फ्रिझी केसांपासून मिळवा सुटका; फॉलो करा या ५ सोप्या हेअर केअर टिप्स

SCROLL FOR NEXT