Atrocities against women SaamTV
महाराष्ट्र

धक्कादायक | महिलेचा अत्याचाराला विरोध; दरोडेखोराने भाजलं एक महिन्याच्या मुलाच बोट

कुऱ्हाडीने मारहाण करीत 2 महिलांवर केला सामूहिक अत्याचार.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद : दरोडा आणि अत्याचाराची परिसीमा गाठणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad District) पैठण तालुक्यातल्या तोंडोळी येथे घडली आहे. तोंडोळी शिवारातील या मगर वस्तीवर मंगळवारी मध्यरात्री दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. कुऱ्हाडीने मारहाण करीत 2 महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे तर या नराधमांनी महिलांवरती अत्याचार करत वस्तीवरील मोबाईल, रोख रक्कम आणि सोन्याच्या दागिन्यांची लुट करुण वस्तीवरील बेदम मारहाण देखील केली आहे. people molested 2 women)

हे देखील पहा -

वस्तीवर असलेल्या तीन कुटुंबावर ६ ते ७ दरोडेखोरांनी हल्ला चढवला. मध्य प्रदेशातून (Madhya Pradesh) तीन महिन्यापूर्वी आलेल्या कुटुंबावर आभाळ कोसळलं. दरोडेखोरांनी ओल्या बाळंतिणीसह झोपलेल्या महिलेवर अत्याचार केला. पीडित महिला अत्याचार करू देत नसल्यानं तिच्या कडेवर असलेल्या एक महिन्याच्या बाळाचे बोट काडीपेटीने भाजले (The baby's finger burned) आणि अत्याचार केला.

तोंडोळी गावापासून अर्ध्या किलोमीटरवरची ही घटना सुन्न करणारी होती. पोलिसांनी Police तातडीने सहा पथकं तयार करून शोध सुरु केला. एका नराधमाला अटक करण्यात आलीय. आणखी सात नराधम असल्याचा अंदाज आहे. अत्याचाराची परिसीमा गाठणाऱ्या नराधमांना शिक्षा झाल्यानंतरचं अत्याचार पिडीतांना न्याय मिळेल.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

SCROLL FOR NEXT