Cab Rides Saam
महाराष्ट्र

Cab Rides : नाव मोठं, काम खोटं! ऑनलाईन कॅब अॅपकडून राईड रद्द करण्याचं प्रमाण वाढलं, आकडेवारी आली समोर

Cabs Cancel Rides: प्रवासासाठी आपण ऑनलाईन अॅपवरून कॅब बुक करतो. पण, अलीकडे सर्वेक्षणात असं दिसून आलंय की अॅपवरून बुक केल्यानंतरही या कॅब राईड्स रद्द करत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होतेय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

App Cabs Cancel Rides Complaint

अलीकडे आपल्याला कॅब राईड (cab ride) हा प्रवासाचा सर्वात सुलभ पर्याय उपलब्ध झाला आहे. परंतु, आता यातही समस्या निर्माण होत असल्याचं पाहायला मिळतंय. याबाबत राज्यात सर्वेक्षण करण्यात आलंय त्यात ८४ टक्के अॅपवरून टॅक्सी बुक करणाऱ्या ग्राहकांनी दावा केला आहे की, चालक तसंच पोहोचायचं ठिकाण आणि डिजीटल पेमेंट मोड शोधल्यानंतरही कॅब राईड्स बुकींग रद्द केल्या जात आहे. (latest marathi news)

मागील २४ महिन्यांत ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे, असं या वर्षी सप्टेंबर ते १६ जानेवारी दरम्यान केलेल्या ताज्या राष्ट्रीय सर्वेक्षणात म्हटले आहे. हे सर्वेक्षण सोमवारी लोकल सर्कलने प्रसिद्ध केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अॅपवरून कॅब बुक केल्यानंतर येणाऱ्या समस्या

राज्यभरात, चालकांनी राइड्स रद्द (cab ride) केल्या. तसंच कॅब बुक करण्यासाठी बराच वेळ वाट पाहावी लागली, अशा तक्रारी राज्यभरातील ६६ टक्के ग्राहकांनी केल्या आहेत. तसंच मूळ किमतीपेक्षा आकारलेली जास्त किंमत ही देखील प्रमुख चिंता होती. यासाठी ४९ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सहमती दर्शविली आहे. तर ४७ टक्के लोकांनी प्रवासासाठी एग्रीगेटर कॅब मिळविण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली, ही तक्रार केलीय. मागणी जास्त असल्यामुळं राइड-हेलिंग अॅप्सद्वारे वाढीव किंमत आकारली जातेय, हे त्यांचं किंमत धोरण असल्याचं निदर्शनास आलं आहे.

परिवहन कार्यकर्त्यांनी सांगितलं की अॅप केलेलं कॅब (cab ride) बुकिंग स्वीकारत नाही. त्यामुळं परिणामी वापरकर्त्यांचा एक भाग प्रवासासाठी काळ्या पिवळ्या टॅक्सीकडे वळला आहे. याचा परिणाम काळ्या पिवळ्या टॅक्सींच्या प्रवासी संख्येमध्ये वाढ होतेय, हा आहे. काळ्या पिवळ्या टॅक्सींची संख्या गेल्या एका वर्षात २ हजार कॅबने वाढली आहे.

ग्राहकांसाठी डोकेदुखी

सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे की, बर्‍याच शहरांमध्ये अॅप आधारित टॅक्सी सेवेचा पर्याय असण्याची सोय निर्विवाद आहे. कारण यामुळे बाजारातील स्पर्धा आणि स्वतःचे वाहन वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अनेकदा विशिष्ट स्थळी जाण्याची इच्छा नसणे किंवा डिजिटल पेमेंट स्वीकारण्याची इच्छा नसणे, वाढीव किंमत आणि चालकांची उद्धट वर्तणूक, चालकांकडून शेवटच्या क्षणी राइड्स (cab ride) रद्द केल्या जात आहेत. याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे ही ग्राहकांसाठी डोकेदुखी बनली आहे.

वाढीव किमतीची समस्या

संपूर्ण भारतामध्ये ६२ टक्के प्रतिसादकर्त्यांनी वाढीव किमतीच्या समस्यांचा अनुभव घेतला आहे, तर ४८ टक्के लोकांनी वाट पाहण्यात खूप वेळ जातो, ही समस्या नोंदवली आहे. या अयोग्य पद्धतींवरील सरकारी नोटिसांचा कोणताही परिणाम झाला नाही, असा दावा ७० टक्के ग्राहकांनी केलाय तर, टॅक्सी एग्रीगेटर्ससाठी मूलभूत सामान्य मानके तयार केली पाहिजेत, यासाठी ८२ टक्के प्रवासी उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT