Auto Driver Grandma saam tv
महाराष्ट्र

Auto Driver Grandma: कराडच्या आजीची सर्वत्रच चर्चा; 65 वर्षांच्या आजी चालवतायत रिक्षा, पाहा स्पेशल रिपोर्ट

Inspiring Grandma: ६५ वर्षीय मंगल आवळे आजी वयाच्या साठीपश्चातही निर्भयपणे रिक्षा चालवतात, ट्राफिकमधून सहज वाट काढत त्या आजही आत्मविश्वासाने रस्त्यांवर सक्रिय आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

65 वर्षाच्या साताऱ्याच्या आजी सुसाट रिक्षा चालवत आहेत. मात्र त्यांना या वयातही का रिक्षा चालवावी लागत आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ट्राफिकमधून वाट काढणाऱ्या या आहेत 65 वर्षीय मंगल आवळे आजी पासष्टीतही कसलीही भीती न बाळगता त्या बिनधास्तपणे रिक्षा चालवताहेत. पण रिक्षा चालवण्यामागे त्यांची एक स्टोरी आहे.

सातारा जिल्ह्यातील कराडच्या नांदगावमधील मंगल आवळेंना 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलं लहान असतानाच त्यांच्या पतीचं निधन झालं. मुलींची लग्नं झालली आणि मुलगाही एसटी चालक बनला. मात्र घरची परिस्थिती बेताचीच.

त्यामुळे मुलाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आणि स्वतःच्या औषधांचा खर्च निघावा म्हणून मंगल आवळेंनी मुलाकडं रिक्षा शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मुलाने प्रशिक्षण दिलं आणि 15 दिवसातच आजीचा बुंगाट रिक्षा चालवायला लागल्या. रिक्षा चालवून आजी दररोज 500 ते 700 रुपये कमावत आहेत.

टु व्हीलर असो वा फोर व्हीलर ती शिकताना अनेकांची तारांबळ उडते. मात्र निवृत्तीच्या वयात शुगरच्या औषधांचा खर्च भागवण्यासाठी रिक्षाची स्टेअरिंग हाती घेतलीय. त्यामुळे शिकायला वय लागत नाही. तर फक्त इच्छा असावी लागते. हे या आजीनं सिद्ध करुन दाखवलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT