Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani: लंघुशंकेसाठी विहिरीजवळ गेले अन् तोल गेला; ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पडून मृत्यू

Parbhani Latest News in Marathi: परभणीतून दुर्देवी घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय पसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

राजेश काटकर

Parbhani News:

परभणीतून दुर्देवी घटना समोर आली आहे. परभणीच्या जिंतूर शहरातील जमजम कॉलनी परिसरातील ६५ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीत पाय पसरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. रामराव विठ्ठलराव रोकडे असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. (Latest Marathi News)

नेमकं काय घडलं?

रामराव हे रात्री लघुशंकेसाठी घराबाहेरच्या विहीरीजवळ आले. मात्र त्यावेळी त्यांचा अचानक तोल गेला. त्यानंतर रामराव हे पाय घसरून विहिरीत पडले. रामराव विहिरीत पडल्याने मोठा आवाज आला. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांना तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

रामराव यांची प्रकृती आणखी चिंताजनक झाल्यानंतर तातडीने त्यांना परभणीच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. आज शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रामराव यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी नातवंडे असा परिवार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परभणीत शिक्षकाचा अपघाती मृत्यू

परभणीच्या मानवत तालुक्यातील कोथाळा शाळेवर कार्यरत असलेले गोविंद लिंगे कार्यालयीन कामासाठी परभणी येथे गेले होते. काम संपल्यावर ते दुचाकीवर मानवतला परत येत होते. मात्र परभणी पाथरी राष्ट्रीय महामार्ग 61 रोडवर असलेल्या रेंगे फार्म हाऊससमोर कारने त्यांना उडवले. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गोविंद लिंगे अत्यंत संयमी, शांत स्वभावाचे , विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून कोल्हा परिसरात परिचित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT