karad, satara, goa saam tv
महाराष्ट्र

Goa Liquor : नूडल्सच्या नावावर दारुची तस्करी; कराडात Excise चा छापा; साठ लाखांच्या बाटल्या जप्त

गोव्याहून नाशिकला ट्रक नेण्यात येत होता.

संभाजी थोरात

Karad : नूडल्सच्या नावाखाली गाेवा बनावटीच्या दारूची तस्करी राेखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे. एका नूडल्सच्या कंपनीचा माल म्हणून गोव्यातून आणलेली ट्रकभरुन दारू साता-याच्या एक्साईजच्या अधिका-यांनी कराड (karad) येथे पकडली आहे. सुमारे साठ लाखांच्या विदेशी मद्यासह पाेलिसांनी (police) वाहन जप्त करुन एकास ताब्यात घेतले आहे. (Breaking Marathi News)

वैभव वैद्य (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सातारा) यांनी दिलेल्या माहिती अशी : नूडल्सची वाहतूक करत असल्याची पावती दाखवून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करत असल्याचे आमच्या पथकाच्या तपासणीत निदर्शनास आले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता त्यात दारुचे बाॅक्स आढळले.

ही कारवाई पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यातील मालखेड जवळ करण्यात आला आहे. तब्बल साठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हा ट्रक गोव्याहून नाशिकला (nashik) नेण्यात येत होता. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक केली आहे.

दरम्यान शनिवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली येथे गोवा (goa) बनावटीच्या दारूची (liquor) बेकायदा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (maharashtra state excise department) कुडाळ (kudal) पथकाने कारवाई केली हाेती. या कारवाईत तब्बल १ कोटी ८७ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला हाेता.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Mayor Election: महापौरपदासाठी भाजपची मोठी खेळी; मुंबईत मनसे भाजपसोबत जाणार?

अजितदादांच्या अंत्यविधीवेळी बारामतीत धक्कादायक प्रकार; गर्दीत 25 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

अजितदादांच्या विमान अपघाताचं सत्य-असत्य; व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

'भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलमुळे अजितदादांचा घात'; विमान पडलं की पाडलं? संजय राऊतांना संशय

महापौरनिवडीआधीच राजीनामा सत्र, भाजपच्या 102 नगरसेवकांचे राजीनामे?

SCROLL FOR NEXT