कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर! आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण Saam Tv
महाराष्ट्र

कोल्हापूरकरांच्या चिंतेत भर! आढळले डेल्टा प्लसचे 6 रुग्ण

कोल्हापूर जिल्ह्यामधील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज जिल्ह्यात डेल्टा प्लस विषाणूंचे एकूण सहा 6 रुग्ण सापडले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कोल्हापूर : एकीकडे राज्यातील कोरोनाचा Corona या विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहेत तर दुसरीकडे डेल्टा प्लस Delta Plus व्हेरिएंटमुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. यामुळे कोल्हापुरकरांना सुद्धा दिलासा मिळाला होता. जिल्ह्यामधील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच आज जिल्ह्यात डेल्टा प्लस kolhapur district delta plus विषाणूंचे एकूण सहा 6 रुग्ण सापडले आहेत.

त्यापैकी कोल्हापूर शहरात 3 रुग्ण, हातकणंगलेमध्ये 2 रुग्ण आणि निगवे दुमाला येथे 1 रुग्ण सापडला आहे त्यामुळे या भागात खळबळ उडाली आहे. शहरात सापडलेल्या तीन डेल्टा प्लसच्या रुग्णांपैकी 1 रुग्ण विचारेमाळ येथील आहेत तर, दोन रुग्ण सानेगुरुजी वसाहतींतील आहेत.

प्रशासन जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने अधिक सतर्क झाले आहे. हे रुग्ण राहत असलेल्या ठिकाणी सर्व नागरिकांची तपासणी tests करण्याचे आदेश आरोग्य विभागाला Health Department देण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यात डेल्टा व्हेरिएंटचे एकूण 66 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे तीन विविध प्रकार असून त्यांना Ay.1, Ay.2 आणि Ay.3 अशी नावे देण्यात आली आहे. डेल्टा व्हेरिएंटचे म्युटेशन झाल्याने डेल्टा प्लसची निर्मिती झाली. आता डेल्टाच्या स्पाईक प्रथिनेमध्ये K417N नावाच्या अतिरिक्त म्युटेशनमुळे डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये तयार झाला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गावागावात लॉरेन्स बिष्णोई तयार व्हायला पाहिजे'; किर्तनकार भंडारे काय बोलून गेले? VIDEO

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

SCROLL FOR NEXT