Nagpur News Saam TV
महाराष्ट्र

भाड्यानं घर पाहायला जायचं अन् चोरी करायची; 59 वर्षीय महिलेला अटक

मात्र जर तेवढ्यात कोणी महिला आलीच तर भाड्याची खोली आहे का खाली असं विचारते.

मंगेश मोहिते

नागपूर: भाड्याने घर पाहायला आल्याचं दर्शवयाचं आणि घरात कोणी नाही हे बघून त्या घरात चोरी करायची अशा एक 59 वर्षीय महिला चोराला नागपूरच्या तहसील पोलिसांनी अटक केली आहे. तिच्याकडून जवळपास 5 लाख रुपयांचा मुद्देमाल तिच्या घरातून जप्त करण्यात आला आहे. आतापर्यंत अनेक चोरी करणारे चोर पुरुष आणि महिला आपण बघितल्या मात्र नागपूरच्या (Nagpur Police) तहसील पोलिसांनी एक 59 वर्षीय वृद्ध महिला चोराला अटक केली आहे. ती दिवसभर आपली शिकार शोधत फिरते मात्र तिच्यासाठी दुपारचा वेळ महत्वाचा असतो.

दुपारच्या वेळी एकतर महिलाच घरात असतात किंवा मग महिला आपल्या दाराची कडी लावून आजू बाजूला जातात ,गप्पा मारतात. बस तीच संधी ही महिला साधते. आणि उघड्या असलेल्या घरात शिरून हात साफ करते. मात्र जर तेवढ्यात कोणी महिला आलीच तर भाड्याची खोली आहे का खाली असं विचारते.

वृद्ध महिला दिसत असल्याने कोणी संशय पण करत नाही मात्र पोलिसांच्या नजरेतून ही महिला वाचू शकली नाही तिला अटक करून तिच्या घराची झडती घेतली असता तिच्या घरातून वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा 5 लाख रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. वृद्ध महिला असो की पुरुष त्यांच्यावर सगळ्यांचा विश्वास लवकर बसतो त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. मात्र या महिलेने केलेली करतुत ते बघून विश्वास कोणावर करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडचे पालकमंत्री पद स्वीकारल्यानंतर भरत गोगावले यांची पहिली घोषणा

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT