ABVP Saam Tv
महाराष्ट्र

ABVP: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 56 वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन नंदुरबारमध्ये

भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, विशेष करून जनजाती मधील कित्येक क्रांतीकारकांचा त्यात समावेश आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

दिनू गावित

नंदुरबार : भारतीय स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे, विशेष करून जनजाती मधील कित्येक क्रांतीकारकांचा त्यात समावेश आहे. मात्र त्यांची कुठेही नोंद नाही, गावोगाव जाऊन अश्या क्रांतीकारकांची नोंद करून त्यांची खरी माहिती देशवासीयांसमोर आणणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थी परिषदेने वीडा उचलला असून क्रांतीकारकांची खरी माहिती संकलित केली जात आहे. पाठ्यपुस्तकात अश्या अनामिक क्रांतीकारकांची माहिती देणे अपेक्षित आहे. असे प्रतिपादन जनजाती आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चौहान यांनी नंदुरबार येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५६ वे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनचे उद्घाटन करतांना केले.

राष्ट्रीय जनजाती आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हाण यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 56 व्या राज्य प्रदेश अधिवेषनात विद्यार्थ्याचे महत्व विषद करतांना विद्यार्थींचा अर्थ आहे नविनता, शोध, आव्हान असे असुन या तिनही गोष्टींनीच समाज परिवर्तन घडत असल्याचे नमुद केले आहे. विद्यार्थी हा निडर पद्धतीने सत्य बोलत असल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सारख्या संघटना समग्र दृष्टीकोनातुन समाजातील समस्यांचा शोध घेणे आणि त्यांच्या समाधान शोधण्या सारख्या सर्व गोष्टी शिकण्यावर जास्त भर देण्याल्या महत्व देत असल्याने त्यांच वेगळेपण इतरांपेक्षा जास्त असल्याचे हर्ष चव्हाणांनी सांगितले आहे.

हिजाब घालणे किंवा न घालणे यावर सॉलीड बंवडर तयार होईल अशा पद्धतीने काही लोक बोलुन त्यावरच काऊंटर करत आहेत. काही काळापुर्वी बुरख्या विरोधात बोलली हिच लोक इथल्या राजकीय सिस्टीम विरोधात बोलुन निवडणुकीत उपयोग होईल अशा पद्धतीने संसदेत आणि बाहेर हास्यास्पद रित्या बोलत असल्याची टिप्पनी अभिनेता योगेश सोमण यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या व्यासपिठावरुन केली आहे. केरळ न्यायालयाने शाळांच्या ड्रेसकोडबाबत दिलेल्या निर्णयानुसार पालन करुन जिथे ड्रेसकोडबाबत नियमावली नाही अशा ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याप्रमाणे ड्रेस घालण्याची भुमा असल्याचे मत देखील त्यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले आहे.

हे देखील पहा-

या अधिवेशनामध्ये शैक्षणिक, सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील बदल याविषयावर प्रस्ताव पारित करण्यात आले. प्रदेशमंत्री प्रतिवेदनामध्ये अभाविपच्या मागील वर्षाच्या कार्याचे सिंहावलोकन करण्यात आले. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी पश्‍चिम महाराष्ट्र व देवगिरी या दोन प्रांताचे प्रदेश मंत्री, प्रदेश अध्यक्षांची निवड केली जाईल. अधिवेशन दोन सत्रांमध्ये होईल. या अधिवेशनासाठी राज्यातून सुमारे 200 प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. शैक्षणिक बदल, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारावर आसूड याविषयी प्रबोधन करण्यात येईल. हे अधिवेशन १३ फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT