Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed : दुर्दैवी! कर्जबाजारीपणाला कंटाळून 55 वर्षीय शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल

बीडच्या कळसंबर गावातील दुर्दैवी घटना...

विनोद जिरे

Beed News : राज्यात कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या (Farmer) आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. आज बीडमध्ये आणखी एका शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातील या शेतकरी आत्महत्येने हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यात एका 55 वर्षीय शेतकऱ्याने सततची नापिकी अन कर्जबाजारी पणाला कंटाळून, गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. (Beed Latest News)

ही धक्कादायक घटना बीडच्या (Beed) कळसंबर गावात रात्री 11 वाजता उघडकीस आली आहे. सुग्रीव वाघमारे वय 55 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मयत सुग्रीव वाघमारे यांनी, गेल्या काही वर्षांपासून नापिकीमुळे झालेले नुकसान आणि कर्जाचा झालेला डोंगर, या बाबीला कंटाळुन स्वतः च्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. (Maharashtra News)

दरम्यान सुग्रीव वाघमारे यांच्याकडे नेकनुर येथील एस.बी.आय बँकेचे दिड लाख रुपये कर्ज आहे. तर इतर खाजगी व्यवहार देखील असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान याप्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मृत्यूची आकस्मित नोंद करण्यात आली असून या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: अखेर मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय; पुढील ५ दिवस या जिल्यात मुसळधार, IMD कडून अलर्ट

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Mumbai Local : लोकलमधील हत्येप्रकरणी आरोपीचा धक्कादायक खुलासा; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?

Thursday Horoscope : जोडीदारासोबत शांततेत दिवस जाणार, 5 राशींच्या व्यक्तींसाठी दिवस ठरणार गेमचेंजर; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

SCROLL FOR NEXT