Maharashtra Assembly Winter Session 2022 : नागपुरात सध्या विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या पहिला आणि दुसरा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरून गाजल्यानंतर आता तिसऱ्या दिवशी कथित भुखंड घोटाळा प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे. आज कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर ५० खोके एकदम ओके, भूखंडाचे श्रीखंड खाणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्या, अशी घोषणाबाजी केली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. पहिला आणि दुसरा दिवस महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर NIT कथित भूखंड गैरव्यवहार प्रकरणारवरून विरोधकांनी चांगलाच गाजवला. आता तिसऱ्या दिवशीही विरोधकांनी कथित भूखंड घोटाळा प्रकरणावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
विधिमंडळाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी एकत्रित येऊन विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी हातात बँनर घेऊन 'खोके सरकारचा धिक्कार असो', 'भूखंडाचे श्रीखंड करणाच्या धिक्कार असो', अशी घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आली. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुद्धा विरोधकांनी केली.
दरम्यान, विधानसभेचे कामकाज सुरू झाले असून प्रश्न-उत्तरांचा तास सुरू आहे. तर विधानपरिषेदचे कामकाजही थोड्यात वेळात सुरू होणार आहे. आज विधिमंडळात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे. या प्रश्नावरून शिंदे सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल, दरम्यान आजच्या दिवशी विधिमंडळात नेमकं काय होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.