55 village of surgana taluka nashik अभिजीत सोनावणे
महाराष्ट्र

मोठी बातमी! राज्यातील ५५ गावांचा गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा; नाशिकच्या सुरगणा तालुक्यातील गावकऱ्यांची आज बैठक

55 village of Surgana Taluka Nashik: महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सुरगाणा तालुक्याच्या ५५ गावातील आदिवासी गावकऱ्यांची याबाबत आज बैठक होणार आहे.

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

Nashik Latest News: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सुरु असतानाच आता एक नवं संकट समोर ठाकलं आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील अनेक गावांनी कर्नाटाकात सामील होण्याचा इशारा दिलेला असतानाच आता महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील काही गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा दिलेला आहे. नाशिकच्या सुरगणा जिल्ह्यातील सुमारे ५५ गावांनी गुजरातमध्ये सामील होण्याचा इशारा महाराष्ट्र सरकारला दिलेला आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील असलेल्या सुरगाणा तालुक्याच्या ५५ गावातील आदिवासी गावकऱ्यांची याबाबत आज बैठक होणार आहे. (Maharashtra-Gujrat News)

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील सुरगाणा तालुक्यातील आदिवासी गावकऱ्यांची आज बैठक होणार आहे. आदिवासी भागात सोयी सुविधा द्या, अन्यथा आमची गावं गुजरातला जोडा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागाच्या ५५ गावातील आदिवासी बांधव आक्रमक झाले आहेत.

याबाबत आंदोलकांची दिशा ठरवण्यासाठी आज महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील पांगारगण गावात ही बैठक होणार आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवर गुजरातमधील आदिवासी गावांना सर्व सोयी-सुविधा, तर महाराष्ट्रात मात्र आदिवासी बांधव सोयी सुविधांपासून वंचित असल्यानं या गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे सीमावर्ती भागातील आदिवासी बांधवांनी आपलं गाऱ्हाणं मांडण्यासाठी ही नवी कलुप्ती शोधली आहे.

महाराष्ट्रातील २८ ग्रामपंचायती निघाल्या कर्नाटकात

याआधीच अक्कलकोट (akkalkot) आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील तब्बल अठ्ठावीस गावाच्या सरपंच अन् ग्रामस्थ्यांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा नुकतीच व्यक्त केली हाेती. त्यासाठी तडवळ भागातील ग्रामस्थांनी कर्नाटकच्या समर्थनात घोषणाबाजी देखील केली हाेती. या ग्रामस्थांवर पाेलिसांची (police) आता करडी नजर आहे.

महाराष्ट्रातल्या ४० गावांनंतर आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही कर्नाटकचा दावा

जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Basavaraj S Bommai) आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आपल्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करत बोम्मईंनी हा दावा केला आहे. 'कर्नाटकच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. उलट महाराष्ट्रातील सोलापूर आणि अक्कलकोट या कन्नड भाषिक भागांनी कर्नाटकात सामील व्हावं, अशी आमची मागणी आहे' असं बोम्मई म्हणालेत. (Maharashtra News)

सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्रातील सीमावादाचा मुद्दा पेटलेला असताना कर्नाटक सरकारने सांगलीतील गावांना पाणी देऊन महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. आता याला प्रत्तुत्तर म्हणून महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी नवी खेळी खेळली आहे. सीमा भागातील गावांमध्ये मराठी भाषेच्या संवर्धनासाठी गावांना दिल्या जाणाऱ्या मदतीत दुप्पटीने वाढ केली जाणार असल्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. (Maharashtra - Karnataka Border Dispute)

या पूर्वी सीमाभागात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला १ लाख रुपये दिले जात होते. मात्र सीमा प्रश्नावरून दोन राज्यात वाद उफळून आल्याने सीमा भागातील गावांना आकर्षित करण्यासाठी आणि त्या गावांमध्ये मराठीच्या संवर्धनासाठी प्रत्येक गावाला २ लाख ते जास्तीत जास्त १० लाख रुपये देण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला आहे. येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाला मंजूरी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa: वर्ल्ड चॅम्पियन्सचा नाद करायचा नाय! भारताचा द.आफ्रिकेवर मोठा विजय; ३-१ ने मालिका जिंकली

IND vs SA: पैसा वसूल मॅच! संजू - तिलकची शतकं; भारताने उभारला रेकॉर्ड ब्रेकिंग स्कोअर

Assembly Election: भुसा पाडायला आलोय, दादा भुसेंवर टीकास्त्र; शिंदे सेनेच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली !

Sanju Samson Six: खूप जोरात लागला..संजूच्या षटकारामुळे महिला फॅनला रडू कोसळलं - VIDEO

IND vs SA: संजू सॅमसनने खेचला 1500 वा षटकार! टीम इंडियाच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद

SCROLL FOR NEXT