saam tv
महाराष्ट्र

Parbhani : शेकडाे भाविकांना अन्नातून विषबाधा; परभणी जिल्हाधिका-यांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

सर्व ग्रामस्थांची प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी तालुक्यातील सोना गावामध्ये (sona village near parbhani) सप्ताहाच्या कार्यक्रमात भगर व आमटीच्या प्रसादातून जवळपास 400ते 500गावकऱ्यांना विषबाधा झाली. ग्रामस्थांवर सोना गावात व परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. (Maharashtra News)

परभणी तालुक्यातील सोना ह्या गावात सप्ताह सुरू आहे. सकाळी शाबूदाणा उसळ व केळी असा प्रसाद देण्यात आला. रात्री भगर व आमटी करण्यात आली होती. भगर व आमटी खाल्यानंतर गावकऱ्यांना मळमळ व उलट्या सुरू झाल्या. (parbhani latest marathi news)

या घटनेची माहिती गावकऱ्यांनी प्रशासनाला दिली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी स्वत: आरोग्य विभागाला सोबत घेत ग्रामस्थांवर गावातच उपचार सुरू केले. याबराेबच आवश्यकतेनूसार काहींना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्व ग्रामस्थांची प्रकृती स्थिर आहे. ग्रामस्थांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लिफ्टच्या दरवाजात अडकला चिमुकलीचा हात; काळजाचा ठोका चुकवणारी घटना,VIDEO

Maharashtra Live News Update : कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अचानक जोरदार पाऊस

रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल; इराणने अमेरिका-इस्रायलविरुद्ध दम भरला|VIDEO

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

SCROLL FOR NEXT