50 crore to sai baba mandir pathri near parbhani saam tv
महाराष्ट्र

Sai Mandir विकासासाठी 50 कोटी : सईद खान

साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने 91 कोटी 80 लाख 94 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती.

राजेश काटकर

Parbhani News :

परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून राज्य सरकारने 50 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनास वितरीत केला आहे. या संदर्भात शासनाने परिपत्रक काढले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) गटाचे अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्यास यश मिळाले आहे. (Maharashtra News)

साईबाबा जन्मभूमीच्या विकासासाठी प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखडयाला राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2023 रोजी 91 कोटी 80 लाख 94 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी दिली होती.

सन 2023- 24 या आर्थिक वर्षात माहे डिसेंबर 2023 च्या आधिवेशातील पुरवणी मागणी द्वारे तीर्थक्षेत्र विकास आराखडा योजनेच्या अंतर्गत विविध तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास उपलब्ध झालेल्या निधीमधून या आराखड्याकरिता परभणी जिल्हा प्रशासनास 50 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.

या निधीतून जमीन अधिग्रहणावर 39 कोटी 6 लाख 95 हजार रुपये तसेच प्रशासकीय खर्च एकूण विकास कामांवर दहा कोटी 93 लाख पाच हजार रुपये असे एकूण 50 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान आज काढण्यात आलेल्या परिपत्रकात 2023- 2024 या आर्थिक वर्षाकरिता मुख्य लेखाशीर्ष 5452 0211 -53 मोठी बांधकामे अंतर्गत या कामांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापुरात गणेश आगमन मिरवणुकीत ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी 6 गणेश मंडळांवर पोलिसांची कारवाई

दोन हजारांवरील UPI पेमेंटसाठी शुल्क; किती रुपयांच्या व्यवहारांवर किती लागेल चार्ज, नवा नियम कधीपासून होणार लागू?

महाराष्ट्र दुष्काळाच्या उंबरठ्यावर, अर्ध्या राज्याकडे पावसाची पाठ

जरांगेंची आंदोलकांसह मुंबईकडे कूच, मरणार पण शरण नाही जाणार

SBI Stree Shakti Scheme: लाडक्या बहिणींना मिळणार २ कोटींचं कर्ज; व्यवसाय सुरू करण्यासाठी SBI ची खास ऑफर

SCROLL FOR NEXT