Nagpur News: 'देव तारी त्याली कोण मारी' याचा प्रत्यय नागपूरमध्ये आला आहे. नागपुरात ५ वर्षीय चिमुकलीच्या मानेत त्रिशूळ घुसून तोंडातून बाहेर आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागपूरमधील पारडी येथील शिवमंदिरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात ५ वर्षीय चिमुकलीच्या मानेत त्रिशूळ घुसून तोंडातून बाहेर आल्याची घटना घडली आहे. खेळता खेळता त्रिशूळावर पडल्याने एक शूळा पाच वर्षीय चिमुकलीच्या तोंडात शिरला. त्यानंतर तो शूळा थेट तोंडातून बाहेर आला.
नागपूरमधील पारडी येथील शिवमंदिरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी चिमुकलीला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी मोठ्या हुशारीने तिचे प्राण वाचवले. (Nagpur News)
नेमकं काय घडलं?
नागपुरात ५ वर्षीय चिमुकली पारडी येथील शिवमंदिरात खेळत होती. ही चिमुकली मंदिरात खेळता खेळता अचानक त्रिशूळावर पडली. यानंतर या चिमुकलीच्या तोंडातून त्रिशूळ हा शिरून तोंडातून बाहेर आला. त्यानंतर तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरड केल्याने शेजारी धावून आले.
या घटनेनंतर चिमुकलीला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल केलेल्या चिमुकलीवर डॉक्टरांनी शर्थीचे उपचार करीत मुलीचे प्राण वाचविले. सध्या चिमुकलीची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.