Dhule Accident
Dhule Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai-Agra Highway Accident: धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 13 जणांचा मृत्यू; 20 ते 25 जण जखमी

Priya More

Dhule News: धुळ्यातील मुंबई- आग्रा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनर थेट हॉटेलमध्ये घुसला. शिरपूर येथील पळासणेर येथील मध्यप्रदेश बॉर्डरवर ही अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील पळासणेर येथील मध्यप्रदेश राज्याच्या बॉर्डरवर हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला. चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटल्यामुळे ही घटना घडली आहे. या अपघातामध्ये कंटेनरने अनेक वाहनांसह नागरिकांना चिरले. अपघातामध्ये पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर 8 जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातातील मृतांचा आकडा 13 वर पोहचला आहे.

या अपघातामध्ये 20 ते 25 जण जखमी झाले आहेत. जखमींमधील अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना लहान मुलं आणि महिलांचा समावेश आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये भरधाव कंटेनरने आधी कारला जोरदार धडक दिली त्यानंतर तो थेट हॉटेलमध्ये घुसला असल्याचे दिसत आहे.

अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये आणि खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनास्थळी स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्य सुरु आहे. शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. या अपघातामध्ये कंटेनरचा चक्काचूर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिण अडचणींच्या सापळ्यात; सर्व्हर डाऊनमुळे लाडक्या बहिणींचा हिरमोड

Ladki Bahin Yojana: साम टीव्हीच्या बातमीचा दणका! लाडक्या बहिणींची लूट करणाऱ्या तलाठ्यावर निलंबनाच्या कारवाईनंतर थेट FIR दाखल

Spider-Man Thief: मुंबईत 'स्पायडर मॅन' चोर! उंच इमारतींवर चढून करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Leopard Sterilisation: वन्यजीव-मानव संघर्ष वाढणार? बिबट्यांच्या नसबंदीला केंद्राचा नकार, जुन्नरकरांचं टेंशन वाढलं

Legislative Assembly Elections: विधान परिषद निवडणुकीच्या धुमाळीत ५:२५ ची चर्चा; काय आहे ५:२५ चा आकडा?

SCROLL FOR NEXT