459 villages depend on water tankers in sambhajinagar  Saam Digital
महाराष्ट्र

संभाजीनगर : दुष्काळाची दाहकता वाढली, 459 गावांत 646 टँकरद्वारे पाणीपुरवठा; 274 गावांसाठी 340 विहिरींचे अधिग्रहण

sambhajinagar water crisis : ग्रामीण भागातील महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे. दरम्यान जिल्हाभरात अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.

Siddharth Latkar

- रामनाथ ढाकणे

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 459 गावांना 646 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्या 274 गावांसाठी 340 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्या विहिरीतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध देखील घातला आहे. (Maharashtra News)

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पुढारी नेते आणि प्रशासन मग्न असले तरी दुसरीकडे मात्र ग्रामीण भागातील नागरिकांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 298 गावे आणि 48 वाड्यांना 443 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात होता. या महिन्यात उष्णतेचा पारा वाढत असल्याने विहिरी, हातपंप आणि तलावातील पाणी पातळी घटली आहे. तर काही ठिकाणी छोटे मोठे प्रकल्प कोरडे देखील पडले आहेत.

सद्यस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 459 गावे तहानलेली असून त्यांना 646 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना कामधंदे सोडून दिवसभर टँकरच्या प्रतीक्षेत ताटकळत राहावे लागत आहे. दरम्यान जिल्हाभरात अनेक गावांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या 646 टँकरच्या 1237 खेपाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर जिल्ह्यातील 274 गावांसाठी 340 विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. त्या विहिरीतील पाणी शेती किंवा अन्य प्रयोजनासाठी वापरण्यास प्रतिबंध देखील घातला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Multibagger stock : देनेवाला जब भी देता...! वर्षभरात एका लाखाचे झाले 8,400,000 रुपये; १०० रुपयांच्या शेअरने केली कमाल

प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब? केंद्र सरकारची नवी योजना? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Maharashtra Live News Update : बीडमध्ये साळेगावजवळ कार पलटी झालेल्या अपघातात दोघे जखमी

Drink Water At Night: रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिणं योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics: मी मंत्री कसा झालो, मलाही कळालं नाही, मुरलीधर मोहोळ यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा|VIDEO

SCROLL FOR NEXT