41 thousand students to appear for hsc exam 2024 in beed saam tv
महाराष्ट्र

HSC Exam 2024 : बेस्ट ऑफ लक! १२ वीची परीक्षा आजपासून, कॉपी करण्याचा विचार करु नका; बीड जिल्ह्यात भरारी पथकांची नियुक्ती

या अनुषंगाने बीड जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. परीक्षेची पूर्वतयारी व कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना केल्या.

विनोद जिरे

Beed News :

बीड जिल्ह्यात आजपासून बारावीची परीक्षेस प्रारंभ हाेत आहे. जिल्ह्यात एकूण 102 परीक्षा केंद्रावर 41 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. 6 भरारी पथकांच्या माध्यमातून कॉपी बहादरावर करडी नजर राहणार आहे. परीक्षा कालावधीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ हे परीक्षा केंद्रांवर भेटी देणार आहेत. (Maharashtra News)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेला आजपासून (ता. 21 फेब्रुवारी) प्रारंभ हाेत आहे. ही परीक्षा 19 मार्चपर्यंत असणार आहे.

या अनुषंगाने बीड जिल्हा दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. परीक्षेची पूर्वतयारी व कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी बीड व अंबाजोगाईत प्राचार्य, मुख्याध्यापक, केंद्र संचालकांच्या बैठका घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यातील 102 केंद्रांवर 41 हजार 52 विद्यार्थी प्रविष्ट आहेत. प्रश्नपत्रिका पुरवठा व उत्तर पत्रिका संकलनासाठी परीक्षक, सहायक परीक्षक नियुक्त केल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. दरम्यान 6 भरारी पथकांच्या माध्यमातून कॉपी बहादरावर करडी नजर असणार असून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, सीईओ देखील परीक्षा केंद्राला भेटी देणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ₹४५०० की ३००० रूपये, लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर पैसे जमा, लगेच करा चेक

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

Petrol-Diesel Prices : गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागले; तुमच्या शहरातील दर काय?

Alcohol Side Effects: मेंदुपासून थेट ह्रदयाला धोका, दारुमुळे शरीरावर होतात हे 7 गंभीर परिणाम

वादळाचा थरार! माणूस थेट हवेत उडाला, धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT