महाराष्ट्र

Nagpur PSI End Life : ३४ वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाची आत्महत्या, नागपूरमधील घटना

Nagpur PSI Gopal Gole News : गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रविण वाकचौरे

पराग ढोबळे

Nagpur News :

नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते, अशी माहिती देखील समोर आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गोपाल गोळे यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या. मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे यांच्या कुटुंबियांना याबाबत पोलीस स्टेशनमध्ये फोन करुन चौकशी केली. त्यावेळी ते पोलीस स्टेशनलाही आले नसल्याची माहिती मिळाली. (Latest Marathi News)

गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या दोन कर्मचारी गोळे यांच्या घरी पोहोचले. त्यावेळी गोळे हे घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे पोलिसांना अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे शहर काँग्रेसच्या वतीने आज थेट राजभवनावर आंदोलन

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेता गंभीर जखमी; हाताला दुखापत, अंथरुणावरून उठणेही झाले कठीण

धक्कादायक! व्यापाऱ्याने पत्नी अन् २ मुलींची हत्या केली, त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं

Rain Update : पुण्याला रेड अलर्ट, मुंबईसह १० जिल्ह्याना अतिमुसळधार पावसाचा इशारा; तुमच्या जिल्ह्याचा यात समावेश आहे का?

Maharashtra Politics: काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT