Beed Crime विनोद जिरे
महाराष्ट्र

मद्यधुंद 3 तरूणांकडून 34 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

विनोद जिरे

बीड: शुल्लक कारणावरून एका 34 वर्षीय तरुणावर, अज्ञात 3 जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना, बीडच्या (Beed) गेवराई जवळील जातेगाव रोडवर सोनवडी फाटा येथे घडली आहे. ज्ञानेश्वर संजय तेलुरे (वय- 34) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव असून प्रकृती चिंताजनक असल्याने औरंगाबाद (Aurangabad) येथे खासगी रुग्णालयात (hospital) उपचार सुरू आहेत.

हे देखील पहा-

ज्ञानेश्वर संजय तेलुरे हा तरुण गेवराईकडून स्वतःच्या मोटारसायकलने आपल्या गावांकडे (village) परत जात असतांना, जातेगाव रोडवरील सोनवाडी फाट्यावर त्याला मद्यपान करणाऱ्या 3 लोकांनी बिस्लरी बॉटल (Bisleri water) फेकून मारली. दरम्यान ती बॉटल का मारली? याचा जाब ज्ञानेश्वर याने विचारल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या 3 तरूणांनी त्यांच्याकडे असलेल्या धारदार हत्याराने ज्ञानेश्वर याच्या अंगावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.

यामध्ये तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरला तसेच सोडुन हल्लेखोर फरार झाले आहेत. दरम्यान या घटनेने खळबळ उडाली असून गेवराई (Gevrai) पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Police) करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव पोलिसांची मोठी कारवाई; ३५ लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचा आरोप

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

Amba Haldi Benefits Foot Sprain : पाय मुरगळल्यावर ताबडतोब आंबेहळदीचा सोपा उपाय करा; सूज आणि वेदना होईल कमी

SCROLL FOR NEXT