sugar commissionerate pune saam tv
महाराष्ट्र

Sugarcane FRP : 1483 काेटी थकबाकी... एफआरपी थकविणा-या कारखान्यांवर कारवाईचे धाडस जिल्हाधिकारी दाखविणार?

यंदा देखील कारवाई होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Siddharth Latkar

- सचिन जाधव

Pune News : राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३१ सहकारी व खासगी कारखान्यांनी मागील तीन वर्षात शेतकऱ्यांची तब्बल १ हजार ४८३ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याप्रकरणी साखर आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. (Maharashtra News)

हे सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार याकडे लक्ष आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (pankaja munde), सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील (sanjaykaka patil) , काँग्रेसचे पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे (sangram thopte), गेवराईचे अमरसिंह पंडित (amarsinh pandit), माजी मंत्री बबनराव पाचपुते (babanrao pachpute) यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते (vikramsinh pachpute), मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे , साताऱ्यातील आमदार मकरंद पाटील (makrand patil) अशा बड्या राजकीय नेत्यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.

साखर आयुक्तालयाकडून आदेश आल्यानंतर सर्व निकष लावून एफआरपी वसुलीसाठी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करणे, कारखान्याला टाळे ठोकणे, कारखान्यातील साखर बाहेर न पाठवणे अशी कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे.

परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करणे शक्य होत नाही अशी चर्चा पुन्हा सुरु झाली आहे. यंदा देखील कारवाई होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

Rain Alert : राज्याला अवकाळीचा तडाखा, वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मुंबई, ठाणेसह २४ जिल्ह्यांसाठी पुढील काही तास महत्त्वाचे

SCROLL FOR NEXT