Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident : मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना भरधाव ट्रकने चिरडलं, आजोबांच्या डोळ्यासमोर नातवाने सोडले प्राण

Nanded Accident News : नांदेडच्या नवीन कौठा परिसरात भरधाव हायवा ट्रकच्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला असून आजोबा गंभीर जखमी झाले आहेत. आरोपी चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने पादचारी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Alisha Khedekar

  • नांदेडमध्ये भरधाव हायवाने तीन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू

  • आजोबा गंभीर जखमी, उपचार सुरू

  • आरोपी चालक पोलिसांच्या ताब्यात

  • पादचारी सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण

माधव सावरगावे, नांदेड

नांदेडमधून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आनंदाने आजोळी आलेल्या अवघ्या तीन वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याला भराधव हायवा ट्रकने चिरडले. या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला. सदर अपघात नवीन कौठा येथील चौकात काल सकाळच्या सुमारास घडला असून चिमुकल्यासह त्याचे वृद्ध आजोबा देखील जखमी झाले आहेत. मृत चिमुकल्याचे नाव प्रणव संपत आचार्य असे आहे, तर त्याचे आजोबा राजेश माधवराव भुतके असे आहे.

बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई तालुक्यातील बागझरी येथील प्रणव आचार्य हा तीन दिवसांपूर्वीच त्याच्या आईसोबत नवीन कौठा येथील आजोबांच्या घरी आला होता. घटना घडली त्या दिवशी प्रणव हा त्याचे आजोबा राजेश भुतके यांच्यासोबत सकाळी साडेसातच्या सुमारास जॉगिंगला गेला होता.

जॉगिंग करून दोघे घराकडे परत येत असतानाच आय. जी. ऑफीससमोर वाय पॉइंटवर (पी.व्ही.आर.समोरील चौकात) हा अपघात झाला. मुरूम टाकून येणाऱ्या या भरधाव वेगातील हायवा ट्रकच्या चालकाने निष्काळजीपणे वळण घेत पादचारी असलेल्या आजोबा-नातवाला जोरदार धडक दिली.या धडकेत आजोबा गंभीर जखमी झाले तर ३ वर्षाच्या प्रणवचा जागीच मृत्यू झाला.

मृत चिमुकल्याच्या आजोबांवर विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मृत प्रणवचे मामा नागेश राजेश भुतके यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी वाहनचालका विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी वाहनचालकास तातडीने ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे भरधाव वेगातील अवजड वाहने आणि निष्पाप पादचारी नागरिकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिबट्याच्या दहशतीतही रणरागिणी पुढे; चंद्रपुरात महिलांचा धाडसी निर्णय

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

SCROLL FOR NEXT