Ratnagiri Crime Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri Crime: दागिन्यांपुढे माणुसकी हरली; तीन वृद्ध महिलांचा खून

अज्ञात चोरट्यांनी या तिघींचा खून करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने चोरल्याची बाब उघकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रत्नागिरी - दापोली (Dapoli) तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथे एकाच घरात तीन महिलांचा खून झाल्याची धक्कदायक घटना घडली होती. यानंतर आरोपींनी संबंधित वृद्ध महिलांचा मृतदेह जाळला होता. प्राथमिक माहितीनुसार, ही हत्या मृत महिलांच्या अंगावरील दागिन्यांसाठी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पुढील तपस पोलिसांकडून (Police) करण्यात येत आहे. (3 old women brutal killed)

हे देखील पहा -

या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पार्वती पाटणे (90), रुक्मिणी पाटणे (80) आणि सत्यवती पाटणे (57) अशी खून झालेल्या महिलांची नवे आहेत. अज्ञात चोरट्यांनी या तिघींचा खून करून त्यांच्या अंगावरील 1 लाख 62 हजार 150 रुपयांचे दागिने चोरल्याची बाब उघकीस आली आहे.

दापोली तालुक्यातील वणोशी खोतवाडी येथील एकाच घरात तीन वृद्ध महिलांचा खून करून त्यांना जाळण्यात आलं होत. वणोशी खोतवाडी या गावात केवळ 25 घरं आहेत. या गावातील अनेकजण कामानिमित्त मोठ्या शहरात स्थलांतरित झाले आहे. त्यामुळे गावात सध्या केवळ 4 ते 5 कुटुंब राहतात. दरम्यान ऐन संक्रातीच्या दिवशी या तिन्ही वयोवृद्ध महिलांचा खून करण्यात आला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Health Care : शरीरातील Vitamin D कमी झाल्यावर दिसतील 'ही' लक्षणे, जाणून घ्या उपाय

Moti Mangalsutra Designs: मोती मंगळसूत्राच्या हटके डिझाईन्स, हे 5 पॅटर्न सध्या ट्रेडिंगमध्ये

Fake Currency : ₹५०० च्या बनावट नोटा आढळल्या, महाराष्ट्रात उडाली खळबळ, कोणत्या जिल्ह्यात काम करतेय रॅकेट?

Accident : काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, मित्राच्या साखरपुड्याला निघाले, पण ३ मित्रांचा वाटेतच घात

SCROLL FOR NEXT