Solapur Accident News
Solapur Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Solapur News: स्वप्न राहिलं अपूर्ण! शिक्षणासाठी सोलापूरवरुन पुण्याला निघाले, पण वाटेतच 3 मित्रांवर काळाचा घाला

Priya More

Solapur Police: सोलापूरमध्ये भीषण अपघातामध्ये (Solapur Accident) तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला आहे. शिक्षणानिमित्त हे तिघे मित्र पुण्याकडे (Pune) निघाले होते. पण पुण्याला पोहचण्यापूर्वीच त्यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे घोंगडेवस्तीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरच्या घोंगडेवस्ती येथे राहणारे तिघे मित्र पुण्याकडे निघाले होते. बाइकवरुन हे तिघेजण प्रवास करत होते. पण टेंभुर्णी येथे एका अज्ञात वाहनाने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमी तरुणाला तात्काळ सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला.

राज हळके, तेजस इंडी आणि गणेश शेरीकर अशी अपघातात मृत्यू झालेल्या तीन मित्रांची नावं आहेत. राज, तेजस आणि गणेश हे तिघेही घोंगडेवस्ती येथे राहत होते. बुधवारी मध्यरात्री ते शिक्षणासाठी पुण्याकडे जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे घोंगडेवस्तीवर शोककळा पसरली आहे. हे तिघेही बसव प्रतिष्ठानचे सदस्य आणि शिवप्रेमी मित्र मंडळाचे कार्यकर्ते असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, सांगलीमध्ये गुरुवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. विटा- महाबळेश्वर राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स आणि कार या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या अपघातातून सदानंद दादोबा काशीद हे बचावले असून ते जखमी झाले आहेत. अपघातातील जखमीवर उपचार सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : राहुल गांधी एक प्रवासी, देवेंद्र फडणवीस यांंचा खोटक टोला

Relationship Tips: 'या' मुलांच्या प्रेमात चुकूनही पडू नका; आयुष्य होईल उद्धस्त

MI vs KKR, IPL 2024: मुंबई की कोलकाता? कोण मारणार बाजी? पाहा दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड

Health Tips: एक महिना साखर खाणं करा बंद; शरीराला होतील अनेक फायदे

Kiran Sarnaik |आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारचा अपघात

SCROLL FOR NEXT