Ambarnath Accident News: लग्नावरून परतताना काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू; 2 गंभीर जखमी

Ambarnath MIDC Accident: अंबरनाथ एमआयडीसीत गेल्या चार दिवसात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे.
Ambarnath Accident News
Ambarnath Accident NewsSaam tv

Ambarnath Accident News: अंबरनाथ एमआयडीसीत अपघातांचं सत्र सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री लग्नावरून परतणाऱ्या दुचाकीवरील परिवाराला एका टेम्पोने धडक दिली. यामध्ये दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

Ambarnath Accident News
Army Helicopter crashed: मोठी बातमी! जम्मू- काश्मिरमध्ये सैन्यदलाचे विमान कोसळले; २ पायलट जखमी

लग्न समारंभाहून परतताना काळाचा घाला...

समोर आलेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये (Ambarnath) राहणारे सोमनाथ भंगारे हे आपल्या कुटुंबासोबत पनवेलला लग्न समारंभासाठी गेले होते. तिथून दुचाकीवर परतत असताना अंबरनाथ एमआयडीसीत एका टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सोमनाथ भंगारे यांचा जागीच मृत्यू झाला.

तर मालू भंगारे आणि तुलसी भंगारे हे दोघे गंभीर जखमी झाले. या सर्वांना तातडीने उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले आहे. रुग्णालयात मालू आणि तुलसी भंगारे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना उपचारांसाठी थेट मुंबईला हलवण्यात आले.

Ambarnath Accident News
Cyclone Mocha : अस्मानी संकट! नांदेडमध्ये मोचा चक्रीवादळाचा कहर; गोठा कोसळल्याने जनावरे दगावली

चार दिवसांतील दुसरा मोठा अपघात...

या अपघाताची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी घाव घेत तपासाला सुरुवात केली. अंबरनाथ एमआयडीसीत गेल्या चार दिवसात झालेला हा दुसरा मोठा अपघात आहे. त्यामुळे नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

विटा- महाबळेश्वर महामार्गावर भीषण अपघात...

दरम्यान, आज सकाळी विटा- महाबळेश्वर (Vita- Mahabaleshwar) राज्य मार्गावर ट्रॅव्हल्स आणि कार या दाेन वाहनांत भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली होती. या अपघातात चार जण जागीच ठार झाले. यामध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com