दुर्दैवी : 11 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या 27 वर्षीय शेतकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या संदीप नागरे
महाराष्ट्र

दुर्दैवी : 11 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या 27 वर्षीय शेतकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

नुकतच लग्न झालेला आणि नव्या संसाराची सुरुवात केलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.

संदीप नागरे, साम टीव्ही, हिंगोली

हिंगोली : शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या बातम्या आपण सतत ऐकत असतो कधी कर्जामुळे कधी नापिकीमुळे हा बळीराजा आपलं आयुष्य संपवत असतो मात्र नुकतच लग्न झालेला आणि नव्या संसाराची सुरुवात केलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची एक दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यात (Hingoli District) घडली आहे.

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात म्हाळसापुर येथील रहिवासी असणाऱ्या 27 वर्षीय तरुण शेतकऱ्याने (Farmer) गळफास घेऊन आत्महत्या केली असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव किसन अशोक मळेकर (Kisan Ashok Malekar) असं आहे.

11 महिनापूर्वीच झालेला विवाह -

किसन यांचा विवाह 11 महिन्यापूर्वीच झाला होता, मात्र आज सकाळी कुटुंबियांना शेतात जाऊन येत असल्याचे सांगत मळेकर यांनी त्यांच्याच शेतात असलेल्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच सेनगाव पोलिसांनी तातडीने धाव घेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला. किसन यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati : अमरावती जिल्ह्यात ३५ टक्के शेतकरी अतिवृष्टीच्या मदतीपासून दूरच; शासनाची हमी हवेतच

Maharashtra Politics : दिवाळीत धमाका! भाजपच्या गळाला मोठा मासा, ६ टर्म आमदार कमळ घेण्याच्या तयारीत

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

छत्रपती शिवाजी महाराज दिवाळी कसे साजरी करायचे? पाहा हे दुर्मिळ ७ फोटो

रक्तप्रवाहात अडथळा, नसा बंद पडण्याची भीती? खा १ फळ, हार्ट अटॅकचा धोका टळेल

SCROLL FOR NEXT