माळीण वासियांकडुन आपत्तीग्रस्तांसाठी 25 हजारांची मदत रोहिदास गाडगे
महाराष्ट्र

माळीण वासियांकडुन आपत्तीग्रस्तांसाठी 25 हजारांची मदत

माळीण वासियांनी मुख्यमंत्री साह्याता निधीला 25 हजारांची मदत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे सुपुर्द केली.

रोहिदास गाडगे

माळीण वासियांनी मुख्यमंत्री साह्याता निधीला 25 हजारांची मदत गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे सुपुर्द केली.25 thousand assistance to CM assistance fund from Malin residents

सात वर्षापुर्वी पुण्याच्या माळीण(Malin) गावावरती दरड कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालं. लहानग्यांसह कुटुंबातील कर्ते व्यक्ती या दुदैवी घटनेत गेले तेव्हा पासुन आजपर्यत या वेदना माळीणवासि भोगत आहेत, आपण जे भोगलं ते कोणाच्याच वाट्याला येऊ नयेत तसेच सात वर्षापुर्वी अनेक मदतीचे हात माळीण वासियांकडे वळाले होते आता आमचीही काही जबाबदारी आहे अशी भावना मनात ठेवुन दरड कोसळुन अनेकांचे संसार उघड्यावर आलेत त्यांच्या मदतीसाठी माळीण मधील ग्रामस्थांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांकडे 25 हजारांचा रुपयांचा धनादेश दिला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात पाऊसाच्या अतिवृष्टीमुळे(Heavy Rain) शेतीसह घरांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या भागातील नुकसानीचा दौरा आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसेपाटील(Home Minister Dilip Walsepatil) यांनी शेताच्या बांधावर जाऊन डोंगरमाथ्यांवरील शेतीची पहाणी केली यावेळी दिलीप वळसेपाटीलांची कन्या पुर्वा दिलीप वळसेपाटील(Purwa WalasePatil) उपस्थित होत्या.

गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी आपली मुलगी पुर्वा वळसेपाटील यांच्या समवेत आजचा दौरा केला यावेळी त्यांनी माळीण गावालाही भेट दिली यावेळी माळीण वासियांनी कोकण परिसरात दरड कोसळण्याच्या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आपणही सात वर्षापुर्वी याच यातना भोगल्याची भावना व्यक्त केली या संकटकाळात देशभरातुन मोठा मदतीचा ओग आला होता आता आम्हीही या संकटातुन सावरत असताना सामाजिक जबाबदारी ओळखुन माळीण वासियांनी 25 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री साह्याता निधीला दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस, भिडे पूल पाण्याखाली

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT