Nandurbar News
Nandurbar News Saam Tv
महाराष्ट्र

अक्कलकुवा येथे दगडफेक प्रकरणी 24 संशयितांना अटक...

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणाऱ्या इसमाविरुध्द भारतीय दंड संहिता व माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2000 ( IT ACT 2000 ) प्रमाणे कठोर कारवाई करण्यात येईल असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सायबर सेल यांच्याकडुन वृत्तपत्र व सोशल मीडियाद्वारे वारंवार नागरीकांना आवाहन करण्यात आले होते. तरी देखील10 जून 2022 रोजी अक्कलकुवा गावातील राहणारा हरीष पवार नावाच्या व्यक्तीने त्याच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक आक्षेपार्ह मजुकुरासह फोटो प्रसारीत केला. त्यामुळे एका समाजाच्या धार्मीक भावना दुखावल्या गेल्यामुळे काही लोक अक्कलकुवा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता पोलीसांनी तात्काळ अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

गुन्हा दाखल करण्याची मागणी घेवुन आलेले आलेले लोक घरी जात असतांना त्यातील काही समाजकंटकांनी आजूबाजूच्या घरांवर दगडफेक केली तसेच रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान केले.

हे देखील पाहा -

सदर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून तसेच लोकांच्या मनातील भिती नाहीशी व्हावी याउद्देशाने अक्कलकुवा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 307,353 , 143 , 147,148,149,336,427 , 120 ( ब ) सह सार्वजनीक संपत्तीची हानी प्रतिबंधक कायदा कलम 7 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 ( १ ) ( ३ ) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

त्याचप्रमाणे काही समाजकंटकांनी एका पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक केल्यामुळे त्याबाबत देखील गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे. गुन्ह्यातील आरोपींबाबत पोलीस अधीक्षक यांनी संपूर्ण माहिती घेवून त्यांना कठोरात कठोर शासन व्हावे याउद्देशाने नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांचे वेगवेगळे पथके तयार करुन आरोपीतांना तात्काळ अटक करण्यासाठी रवाना केले.

त्याअनुषंगाने अक्कलकुवा शहरातील दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांना तसेच दुचाकी व चारचाकी वाहनांचे नुकसान करुन दहशत पसरविणाऱ्या 24 संशयित आरोपीतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या पथकांनी तसेच अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अमंलदारांनी आजु बाजुच्या परीसरातून ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे .

नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील हे स्वत: अक्कलकुवा येथे तळ ठोकून आहेत. तसेच अक्कलकुवा येथे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी देखील भेट देवून परिस्थितीची पाहणी केली . तसेच पोलीसांनी हाताळलेल्या परिस्थितीबाबत समाधान व्यक्त केले आहे. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ . बी . जी . शेखर पाटील यांनी अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे काही लोकांसोबत चर्चा करुन अक्कलकुवा येथील परिस्थतीची माहिती घेतली तसेच अक्कलकुवा वासीयांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे .

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , फेसबुक , इंन्स्टाग्राम , व्हॉट्सऍप , ट्विटर व इतर सोशल मीडियावर धार्मीक भावना भडकविणाऱ्या दोन जातींमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या व खोट्या बातम्या प्रसारीत करणारे व्हिडीओ किंवा पोस्ट प्रसारीत करु नये किंवा त्याबाबत सोशल मीडियावर स्टेटस ठेवू नये. तसेच नंदुरबार जिल्ह्यतील कोणत्याही व्यक्तींनी कायदा हातात घेवू नये . कोणीही कायदा हातात घेतल्यास त्याची गय केली जाणार नाही असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील यांनी आवाहन केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Rate 2nd May 2024: पुण्यात पेट्रोल महागलं अन् डिझेल स्वस्त झालं; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

उन्हाळ्यात प्या ही 5 पेय, Blood Sugar राहील नियंत्रणात

Pushpa Pushpa Song : ‘पुष्पा द रुल’मधलं पहिलं गाणं रिलीज, भन्नाट हूकस्टेप्स पाहून तुम्हीही थिरकाल

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

SCROLL FOR NEXT