Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: ऑनलाइन गेमच्या माध्यमातून लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा डाव? अहमदनगरमध्ये तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न

२२ वर्षीय तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिहार राज्यातील दोघांना संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे

ahmednagar News: २२ वर्षीय तरुणीला पळवून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या बिहार राज्यातील दोघांना संगमनेर पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडिया आणि पब्जी गेमच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी मुलीची आरोपींशी ओळख झाली होती. संगमनेरात येऊन आरोपींनी मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात एका एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २२ वर्षीय तरुणीची पब्जी गेमच्या माध्यमातून बिहार राज्यातील अकरम शेख याच्याशी ओळख झाली होती. अक्रम शेख हा त्याचा मित्र नेमतुल्ला याच्यासह संगमनेर येथे संबंधित मुलीला भेटण्यासाठी आला.

'तू माझ्यासोबत बिहारला चल आपण लग्न करू असे आमिष दाखवून त्याने मुलीला जबरदस्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मुलीने विरोध करत पोलिसांना संपर्क केला असता पोलिसांनी तातडीने अकरम शेख आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले. मात्र, हा लव्ह जिहाद आणि धर्मांतराचा प्रकार असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

दरम्यान, संगमनेर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत असून ऑनलाइन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवून लव्ह जिहाद आणि धर्मांतर करणारे रॅकेट यामागे कार्यरत आहे का की आणखी काही हे पोलीस तपासातच निष्पन्न होईल.

दरम्यान, आरोपींनी यापूर्वी अशा पद्धतीने आणखी मुलींना जाळ्यात ओढले आहे का? याबाबत पोलीस तपासात अद्याप काही समोर येऊ शकले नाही. मात्र, ऑनलाइन गेमच्या माध्यमातून मुलींना फसवून लव्ह जिहाद आणि धर्मांतर करणारे रॅकेट यामागे कार्यरत आहे का की आणखी काही या बाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

SCROLL FOR NEXT