buldhana accident news. students injured saam tv
महाराष्ट्र

Buldhana ST Bus Accident: बुलढाण्यात एसटी बसचा भीषण अपघात, ५५ प्रवाशांची बस घाटात उलटली, मदतकार्य सुरू

Rajur Ghat Accident News : काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनधारकांनी पुढील प्रवासासाठी मदत केली.

संजय जाधव

संजय जाधव, साम टीव्ही बुलढाणा

Buldhana News: बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. ५५ प्रवाशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस राजूर घाटात कोसळली. या भयानक अपघातात बसमधील २० ते २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. (Maharashtra News)

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने राजूर घाटाकडे धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी मदकार्य सुरू केलं असून अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी राजुर घाटात एसटी महामंडळाच्या बसचे पूढील टायर फुटल्याने बस उता-यावर (पाठीमागे) जाऊ लागली. चालकाने बस थांबविण्याचा प्रयत्न केला परंतु ताेपर्यंत बसने रस्ता साेडला आणि एका खड्य्यात पलटी झाली.

या अपघाताची माहिती कळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पाेलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. सर्व जखमींवर बुलढाणा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

पाेलिसांकडून आणि घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार या बसमधील (msrtc bus) जवळपास वीस विद्यार्थ्यासह इतर प्रवासी जखमी झाले आहेत. राजुर, मोताळा तारखेड येथील हे विद्यार्थी बुलढाणा येथे शाळेसाठी येत हाेते. काही विद्यार्थ्यांना खासगी वाहनधारकांनी पुढील प्रवासासाठी मदत केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Hockey Team : पाकिस्तानी हॉकी संघ भारतात येणार; आशिया कप खेळण्याची मंजुरी | VIDEO

Dora Cake Recipe: लहान मुलांच्या आवडीचा डोरा केक आता बनवा घरी, सोपी आहे रेसिपी

Monsoon AC temperature: पावसाळ्याच्या दिवसात एसीचं टेंपरेचर किती ठेवलं पाहिजे?

Ghushmeshwar Waterfall : त्र्यंबकेश्वरपासून काही मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे Hidden धबधबे आयुष्यात एकदातरी पाहा

Pune Traffic Diversions News : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! शहरातील वाहतुकीत आज मोठा बदल; पर्यायी मार्ग कोणते?

SCROLL FOR NEXT