Samruddhi Mahamarg Accident: Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच, सिन्नरजवळ भरधाव कारला अपघात; दोघांचा मृत्यू

Priya More

Samruddhi Mahamarg News Today: समृद्धी महामार्गावरील अपघातांचे (Samruddhi Mahamarg Accident) सत्र सुरूच आहे. आज पुन्हा या महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. सिन्नरजवळ समृद्धी महामार्गावर भरधाव कारला भीषण अपघात (Car Accident) झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताचा तपास नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर इगतपुरी ते शिर्डी टप्प्यात सिन्नरजवळ काराला भीषण अपघात झाला. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली. भरधाव कार ३ ते ४ पलट्या खात दुभाजकाच्या साईड बॅरिकेट्सला धडकली. त्यानंतर ही कार दोन्ही लेनच्या मधोमध जाऊन पडली. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातामध्ये कारमध्ये असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोन्ही व्यक्ती हे श्रीरामपूरचे असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत. हा अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

दरम्यान, भिमाशंकर- मंचर मार्गावर देखील कारला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. गोहे येथील भाविकांच्या कारला अपघात झाला. भिमाशंकरवरुन दर्शन घेऊन परत येत असताना ही घटना घडली. या अपघातात कारमधील भाविक किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातामध्ये कारने दोन वेळा पलटी खाल्ल्या. त्यानंतर ही कार खोल खड्ड्यात पडली. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT