file photo  saam tv
महाराष्ट्र

Jalna : ओढ्यात पोहणं बेतलं जीवावर; गाळात अडकून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

ओढयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात अडकून दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना : जालन्यातून (Jalna) हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. ओढयात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा गाळात अडकून दुर्देवी मृत्यू झाल्याची दुर्दवी घटना घडली आहे. ही घटना अंबड तालुक्यातील दाढेगावात आज, रविवारी दुपारी घडली. पांडुरंग रामा घुंगासे व लक्ष्मण रामा घुंगासे असे या मृत्यू (Death) झालेल्या दोन्ही चुलत भावाची नावे आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. (Jalna news In Marathi )

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण घुंगासे हे आपल्या परिवारासह शेतात असलेल्या वस्तीवर राहतात.त्यांच्या पत्नी आजारी पडल्यामुळे लक्ष्मण यांनी मुलांना गावात आणून सोडले होते.तेव्हा गणेश पांडुरंग घुंगासे (वय १४ वर्षे) हा इयत्ता ८ वी मध्ये शिकत होता.तर महेश लक्ष्मण घुंगासे (वय ५ वर्षं) हा मुलगा शाळेत शिकत नव्हता.यातील गणेश हा शहापूर येथील ओमशांती शाळेत शिकायला होता.

आज शाळेला सुट्टी असल्याने गणेश व महेश हे शेताकडे सायकलवर जात असताना रस्त्यात असलेल्या एका ओढात पाणी असल्याने त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.या भावंडांनी पोहण्यासाठी आपले कपडे व चपला बाजूला ठेऊन एकाने ओढ्यातील ढोहात उडी घेतली. मात्र तो डोहात असलेल्या गाळात फसला आपला भाऊ गाळात फसला हे पाहून दुसऱ्याने ही उडी घेतली मोठ्या प्रमाणात गाळ असल्याने हे दोघे ही गाळात फसले दोघांनी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते हालचालीमुळे गाळात खोलवर रुतत गेले त्यांतच यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

दरम्यान, परिसरात शेळी चारत असलेल्या व्यक्तीला गाळात दोघांचे हात वर दिसले. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करून ही माहिती परिसरातील शेतकऱ्यांना आणि मुलांच्या घरच्यांना दिली.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी दोन्ही मुलांना गळातून बाहेर काढले असता तो पर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात असून या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Tourism: वरळीपासून अगदी जवळची आणि खास ठिकाणं, One Day Trip साठी ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

ROAD ACCIDENT : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला, नवरदेवासह ८ जणांचा मृत्यू, कार थेट कॉलेजच्या भिंतीत घुसली

Brushing Tips: ब्रश करण्याची योग्य वेळ कोणती?

SCROLL FOR NEXT