Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: बीडच्या लिंबागणेश परिसरात भरदिवसा एकाच दिवशी 2 ठिकाणी घरफोडी

सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास...

Shivani Tichkule

Beed News: बीडच्या लिंबागणेश परिसरात भरदिवसा एकाच दिवशी 2 ठिकाणी घरफोडी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लिंबागणेश येथील 60 वर्षीय कमलबाई भगवान खिल्लारे या आपल्या नातीसह स्वतःच्या शेतात कामासाठी गेल्या होत्या. (Latest Marathi News)

सायंकाळी 5 वाजता घरी आल्या असता घराचे कुलूप तुटलेले व दार उघडे दिसले.घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. तर यादरम्यान घरातील सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे..

तर दुसरी घटना परिसरातील मुळूकवाडी येथे घडलीय. गावातील दासु भिमराव ढास हे शेतात काम करून सायंकाळी 7 वाजता घरी आले असता घराचे कुलूप तोडल्याचे दिसुन आले. यादरम्यान घरातील रोख 50 हजारासह व काही सोने चोरीला गेल्याचे दासु ढास व मंडुबाई ढास यांनी पोलिसांना सांगितले. (Beed News)

दरम्यान या दोन्ही चोरीच्या घटनानंतर नेकनूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास हजारे यांच्यासह टीम घटनास्थळी दाखल झाली होते. सदरील घटनेचा पंचनामा नेकनूर पोलिसांनी केला असून याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Maharashtra News Live Update: पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

Lionel Messi: इतिहास रचणाऱ्या लिओनेल मेस्सीला फायनलपूर्वी बसला मोठा धक्का, एम्बाप्पेने एका रात्रीत बदललं सगळं समीकरण

Gold Rate Today India : सोन्याचा भाव पुन्हा घसरला! 7 दिवसांत सोनं इतक्या रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या आजचे ताजे दर

Dal Tadka Recipe : संडे स्पेशल मेन्यू! घरी बनवा ढाबा स्टाईल डाळ तडका, चव अशी की सगळेच रेसिपी विचारतील

SCROLL FOR NEXT